दे. राजा :- शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचालित स्थानिक दीनदयाल विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय दे.राजा जि. बुलढाणा येथे बुधवार दि.२७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री.गणेशाची विधिवत पूजन करून स्थापना करण्यात आली.
प्रसंगी प्राचार्य श्री.रामेश्वरजी कुटे व धर्मपत्नी सौ वंदना ताई, श्री.सुधाकर जायभाये सर व सौ.शारदाताई जायभाये, श्री. रामेश्वर पडूळकर सर व त्यांच्या पत्नी सौ.वर्षाताई पडुळकर या सर्वानी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली.
यानिमित्ताने विद्यालयाच्या श्री.गणेश उत्सव समितीच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यानी पर्यावरण पुरक सजावट करून आकर्षक रोषणाई सुध्दा केलेली पहायला मिळाली.
श्री.गणेश स्थापने साठी महाराज म्हणुन श्री.बाळू मेहूणकर गुरुजी यांनी मंत्रोपचारासह पूजा सांगीतली.या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक - शिक्षिका प्राध्यापक - प्राध्यापिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते. श्री.गणेश उत्सव समितीने दहा दिवसांचे आरतीचे आणि प्रसाद वितरणाचे नियोजन केले असून यानिमित्ताने विद्यालयात विविध स्पर्धांचेही आयोजन समितीच्या वतीने करण्यात आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री.गणेश उत्सव समितीचे प्रमुख श्री.एस.आर.जायभाये व सहप्रमुख श्री. रामेश्वर पडूळकर यांनी आपल्या इतर सहकार्यांच्या मदतीने केले.
________________________

Post a Comment