दीनदयाल विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

लोकनेता न्यूज नेटवर्क

देऊळगाव राजा :- शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचालित दीनदयाल विद्यालय व कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालय  दे.राजा जि बुलढाणा येथे आज शुक्रवार दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती,राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
       सदर कार्यक्रम विद्यालयाचे प्राचार्य मा श्री रामेश्वरजी कुटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. दरम्यान व्यासपीठावर विद्यालयाचे पर्यवेक्षक मा.श्री.राजेशजी भिवटे सर,ज्येष्ठ शिक्षक जायभाये सर,तसेच प्रमुख वक्त्या म्हणून कु.अंजली भातपाखाले,कार्यक्रमाचे आयोजक क्रीडा शिक्षक श्री राजुसिंग राठोड सर आदी उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.कु.अंजली हिने मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. राष्ट्रीय क्रीडा दिन तसेच श्री.गणेशोत्सव या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धांचेही आयोजन विद्यालयात करण्यात आले तसेच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कुस्ती खेळामध्ये जिल्हास्तरावर निवड झालेला विद्यार्थी कारण डोईफोडे याचा सत्कार करून मान्यवरांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
      विद्यालयाचे प्राचार्य मा.कुटे सर यांनी अध्यक्षीय भाषणात खेळातून शिस्त,संयम ध्येयनिष्ठा यादी गुणांची रुजवणूक होत असते,असे सांगून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा  दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.अभिलाषा कुटे हिने केले,श्री. राठोड सर यांनी उपस्थितांचे  आभार मानले.
________________________

0/Post a Comment/Comments