दिग्रस|सदानंद जाधव :- गेल्या ५० वर्षापासुन तेली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या दिग्रस विभागीय तेली समाज संस्था (नोंदणी क्रमांक र.न.महा २८७५/यवतमाळ एफ २८६२) च्या अध्यक्षस्थानी येथील सेवाभावी कार्याची जान असलेले संजीव चोपडे यांची सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सर्वानुमते एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
श्री गणेशोत्सवाचा शुभ संयोग साधून माजी अध्यक्ष श्याम महिंद्रे पाटील, उपाध्यक्ष बंडू अण्णा मात्रे व सचिव शंकर भगत यांच्या पुढाकारात मोठ्या प्रमाणावर हजर असलेल्या समाज बांधवांच्या उपस्थितीत शुक्रवार,२९ ऑगस्टला नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते अधिकृत निवड करण्यात आली. सन १९७५ पासूनच कार्यरत असलेली ही संस्था १९९३ साली रजिस्टर करण्यात आली होती. आधी पासूनच नियमित समाजाचे परिचय व विवाह मेळावे, गुणवंत विद्यार्थ्यांचा व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रम करण्यावर संस्थेने सातत्याने पुढाकार घेतला आहे. या प्रतिष्ठित संस्थेची धुरा आता संजीव चोपडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
शिक्षण, आरोग्य, राष्ट्रप्रेम, कृषी, पर्यावरण, क्रीडा, कला-संस्कृती अशा विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये काम करणारे संजीव रामरावजी चोपडे हे तेली समाज संस्थेच्या कार्यकारिणीत सन १९९३ पासूनच सदस्य आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रती समाजाच्या मोठ्या अपेक्षा आहे. या नविन कार्यकारिणीत शिवदास ढेंगाळे व साहेबराव हटवार हे उपाध्यक्ष, सचिव निलेश तायडे, सहसचिव अनिल वऱ्हाडे, कोषाध्यक्ष गणेश दुर्गे, प्रसिद्धी प्रमुख किशोर मेहेत्रे तर सदस्य म्हणून भारत महिंद्रे, अंकुश मात्रे, शैलेश लाचुरे, विलास क्षीरसागर, गजानन सोनोने, गजानन माहूरे, आशिष काळे, किशोर सदावर्ते, शक्ती डवले व सचिन सोनटक्के यांची निवड करण्यात आली.
________________________

Post a Comment