आरोपीवर गून्हा दाखल करून १०३० रूपय रक्कम जप्त
सेनगाव (महादेव हरण) :- पानकनेरगांव येथील सेनगाव ते रिसोड राष्ट्रीय महामार्गावर कल्याण मटका जुगार खेळणाऱ्या वर सेनगाव पोलिसांनी छापा टाकला आहे यात आरोपी ताब्यात घेऊन गून्हयाची नोंद सूद्धा करण्यात आली.
सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील गेल्या अनेक वर्षांपासून अनिल माणीक जाधव हा धडदांडगा आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या लोकांकडून पैसे घेऊन कल्याण नावाचा मटका जूगार चालवत होता. सेनगाव पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली त्यामाहितीनुसार २५ ऑगस्ट रोजी सेनगाव पोलीस ठाण्याचे एपीआय दीपक मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी जिवन मस्के यांनी तीन वाजता दरम्यान बस स्टँड जवळील चालवल्या जात असलेल्य ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत अनिल माणीक जाधव या आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्ह्य दाखल करून साहित्य सह१०३० रूपय रक्कम जप्त करण्यात आले.
________________________

Post a Comment