राजकुंवर महाविद्यालय वाघ्रूळ (ज ) येथे “डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन” साजरा

लोकनेता न्युज नेटवर्क

जालना :- राजकुंवर महाविद्यालय वाघ्रूळ (ज ) ता. जि . जालना. येथे दि.२३ ऑगस्ट रोजी डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन साजरा करण्यात आला . मुख्य ध्वजारोहण सकाळी प्राचार्य प्रा. आर . ए . जायभाये यांच्या हस्ते करण्यात आले . सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले . ध्वजारोहनानंतर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यकार्माचे अध्यक्ष प्रा. राजेंद जायभाये होते , तर प्रमुख व्याखाते डॉ. डोईफोडे मॅडम यांनी विद्यापीठ स्थापना व विद्यापीठ विषयी माहिती आपल्या मोलिक शब्दात मांडली .  "आपले विद्यापीठ हे ज्ञानाचे दीपस्तंभ असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची अमूल्य देणगी आहे. आपण सारे मिळून विद्यापीठाचा गौरव वाढवू, हेच आजच्या वर्धापन दिनाचे खरे यश आहे." असे प्रा. जायभाये बोलत असतांनी म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल शिंदे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. विजय देशमुख यांनी केले . यावेळी उपस्तीत प्रा. जोगदंड, प्रा. शेख , प्रा. खरात, प्रा. गीते , प्रा.रूपनर मॅडम , प्रा. सातकर मॅडम, श्री भगवान जोगदंड , श्री संतोष जाधव , श्री सुनील शिंदे , श्री गजानन जोगदंड , श्री.पावन जोगदंड उपस्तीत होते.
________________________

0/Post a Comment/Comments