पोलीस स्टेशन किनगाव राजा येथे शांतता समितीची बैठक

नागरिकांची उत्साह पूर्ण उपस्थिती

लोकनेता न्युज नेटवर्क

किनगाव राजा|महेश मुंढे :- दि. 22 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन किनगाव राजा तर्फे शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस श्रीमती मनीषा कदम उपविभागीय पोलीस अधिकारी देऊळगाव राजा, श्री अजित दिवटे तहसीलदार सिंदखेड राजा, श्री भास्कर घुगे बीडिओ पंचायत समिती सिंदखेड राजा, श्री इरफान अली ज्येष्ठ शांतता समिती सदस्य, श्री सुभाष घिके ज्येष्ठ शांतता समिती सदस्य श्री प्रवीण गिते यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच किनगाव राजा परिसरातील महिला, नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते,तसेच किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांचे सरपंच,पत्रकार व इतर मान्यवरही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी गणेशोत्सव,मोहरम तसेच इतर सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना काही सूचना देण्यात आल्या तसेच नागरिकांनीही आप आपल्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या. अफवांना बळी न पडता परस्परांमध्ये एकोपा राखावा, सामाजिक सलोखा टिकून ठेवावा, तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन श्रीमती मनीषा कदम उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी उपस्थित नागरिकांना केले. तसेच श्री अजित दिवटे तहसीलदार सिंदखेड राजा यांनीही शांतता राखण्याचे आवाहन केले. श्री संजय मातोंडकर ठाणेदार पोलीस स्टेशन किनगाव राजा यांनीही उत्कृष्ट मार्गदर्शन केले. या बैठकीत तंटामुक्ती अध्यक्ष,सरपंच, महावितरणचे अधिकारी श्री मालवकर व श्री माघडे तसेच परिसरातील सर्व नागरिकांनी व गणेश मंडळाचे अध्यक्ष व इतर यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीमुळे आगामी सण - उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरे होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पोलीस स्टेशन किनगाव राजा यांचे तर्फे पोलीस कॉन्स्टेबल श्री परसूवाले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

0/Post a Comment/Comments