पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून गावकर्‍यांशी आ.जितेश अंतापूरकर यांनी साधला संवाद

लोकनेता न्यूज नेटवर्क

कुंडलवाडी | गंगाधर दुसलवाड :- देगलूर बिलोली मतदारसंघात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भीषण परिस्थितीची पाहणी व गाव भेटीसाठी आ जितेश अंतापूरकर  साहेब यांनी दि‌२८/०८/२०२५ गुरूवार रोजी नरगंल, थडीसावरगाव, उमरसांगवी, तमलूर, शेळगाव, शेवाळा, हिप्परगा, सगरोळी, बोळेगाव, कार्ला, येसगी या मतदारसंघातील गावांना भेटी देवून पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली.
        या पाहणीदरम्यान आमदार  साहेबांनी पूरग्रस्तांना तातडीने मदत पुरविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना तात्काळ सूचना दिल्या. 
सोबत सर्व प्रशासकीय यंत्रना घेवून नागरीकांच्या समस्या समजून घेवून त्या तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
       तसेच सर्व शेतकरी व गावकऱ्यांना धीर देत, सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले.मतदारसंघातील गावांना भेटी देवून पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीदरम्यान आमदार  साहेबांनी पूरग्रस्तांना तातडीने मदत पुरविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना तात्काळ सूचना दिल्या.
________________________

0/Post a Comment/Comments