भाजपाचे नगरसेवक गोपू महामुने यांचे घरी श्री गणेश स्थापनेच्या वेळी आमदार भीमराव केराम यांची उपस्थिती
लोकनेता न्यूज नेटवर्क
माहूर :- माहूर किनवट चे आमदार भीमराव केराम यांनी श्री गणेश स्थापनेच्या वेळी माहूर नगरपंचायत मधील भाजपाचे नगरसेवक गोपू महामुने यांच्या घरी श्री गणेश स्थापनेच्या वेळी उपस्थिती दर्शविली तर माहूर तालुक्यातील माहूर पोलीस स्टेशन आणि सिंदखेड पोलीस स्टेशन अंतर्गत दीडशेवर गणेश मंडळांची मोठ्या भक्ती भावाने स्थापना करण्यात आली.
तहसील कार्यालय आणि माहूर पोलीस स्टेशन कडून श्री बालाजी मंगलम येथे गणेशभक्त सह तालुक्यातील सर्व पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व लोकसेवकांची शांतता बैठक घेऊन श्री गणेशाचे आगमन आणि विसर्जन डीजे मुक्त वातावरनात करून शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन तहसीलदार अभिजीत जगताप पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे सह मान्यवरांनी केले होते.
श्री गणेश मंडळांच्या स्थापनेच्या वेळी किनवट माहूरचे आमदार भीमराव केराम यांनी अनेक गणेश मंडळांच्या स्थापनेच्या वेळी भेटी देऊन गणेशोत्सव धार्मिक कार्यक्रम घेत सद्भावना सलोखा जपत साजरा करण्याचे आवाहन केले यावेळी माहूर येथील अनेक गणेश मंडळांना त्यांनी भेट दिली तर भाजपाचे नगरसेवक गोपू महामुने यांच्या घरी गणेश मंडळाच्या स्थापनेच्या वेळी हजेरी लावून भक्ती भावात आरती करत दर्शन घेतले यावेळी नगरसेवक गोपू महामुने यांच्या मातोश्री श्रीमती शोभाताई महामुने सुविद्य पत्नी यांचे सहपरिवारातील सदस्यसह मान्यवर उपस्थित होते.
________________________

Post a Comment