काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तूपदाळे यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिक जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला
माहूर :- शहर व तालुक्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासनात स्तरावर पाठपुरावा करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा विडा उचलून गेल्या काही महिन्यापासून पाठपुरावा करत असतांना स्थानिक प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचविण्या पलीकडे काहीही घडत नसल्याने व्यथित होऊन भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांनी दिनम २६ रोजी माहूर शहरातील शेकडो लाभार्थ्यासह जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट निवेदन दिले.
माहूर शहर व तालुक्यातील विविध आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांना शासनामार्फत ५ ब्रास मोफत रेती उपलब्ध करून द्या तसेच खासगी बांधकाम धारकांना रेती उपलब्ध करून द्या या मागणीसाठी दि.२२ जुलै २०२५ रोजी संदर्भीय पत्र २ नुसार तहसीलदार माहूर यांचेकडून लेखी आश्वासन मिळाले परंतु अद्याप अनेक जण वंचित आहेत. तसेच माहूर शहरातील तानुशा बानुशा परिसरात एसटी बसला विनंती थांबा मंजूर करा या मागणीच्या अनुषंगाने रापम आगार माहूर च्या वतीने आगार व्यवस्थापक यांन जा. क्र. / राप/ आप्र/ प्रशा/२५/४५१ दिनांक १९ जुलै २०२५ पत्र देऊन विनंती थांबा सुरु केला परंतु अनेक एसटी बस त्याठीकाणी थांबत नसून रापम त्याबाबत कोणतीही कार्यवाही करीत नाही. त्यामुळे संबधित प्रशासनाने एकीकडे लेखी आश्वासन पत्रे देऊन बोळवण करून जनतेची व नागरिकाची फसवणूक केली असा आरोप जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात करण्यात आला.
यावेळी माहूर नगरपंचायत च्या माजी उपाध्यक्षा सौ.अश्विनी आनंद पाटील तुपदाळे, जेस्ट काँग्रेस नेते शेख मुस्सा, शेख शेरअली, शंकर राठोड, शेख अजगर,शाम जाधव,सुनील पवार, धनंजय जाधव, मनोज राठोड, देवसिंग चव्हाण, तारासिंग जाधव, दत्ता वाघमारे, किनवट माहूर विधानसभा उपाध्यक्ष सचिन बेहेरे, माजी शहर अध्यक्ष अहेमद कुरेशी, सलमान काजी, जमीर खान, शेख शरीफ, सैय्यद मन्नाण, शेख सादिक, जगदीश पाटील तुपदाळे, नवनाथ सूर्यवंशी, सरदार खान, सुशीलकुमार टाक, शेख जावेद,तरबेज खान पठाण, सलीम खान, रामसिंग जाधव, आबाराव महाराज, करणं जाधव, सुनिल राठोड, चांद खान, शेख चंदू, राजू जाधव, सैय्यद जलील, शेख सुलतान, खेरूला खान, प्रल्हाद जाधव, मनोज जाधव, वाजीद खान, कदिर खान, रोशन खान, शेख सौकत कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. त्यानंतर नांदेड येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खा. रविंद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष माजी आ. हणमंत पाटील बेटमोगरेकर, व राजेश पावडे सह कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नक्षत्र लॉन्स येथे आयोजित असलेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीस शेकडो समर्थक व कार्यकर्त्यासह उपस्थिती लावली.
________________________

Post a Comment