मुखेड तालुक्यात ढगफुटी झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान

लोकनेता न्युज नेटवर्क
 

मुखेड | बालाजी साधू :- सर्वच महसूल मंडळात काल सायंकाळी पासून पावसामुळे झालेल्या शेतकऱ्याचे मोठे संकटच आहे मुसळधार पावसामुळे अनेक शेतामध्ये पाणी शिरले असून उभ्या असलेल्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे ढगफुटीच्या सर्व स्वरूपात पडलेल्या या पावसामुळे मुख्यता सोयाबीन उडीद तूर आणि कापूस यासारखी खरी पूर्णता पाण्याखाली गेली आहे काही भागांमध्ये पिक वाहून गेल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे शेतकऱ्याचे म्हणणे आहे की यावर्षी सुरुवातीपासूनच हवामान तर उतार असून महिन्यात करून उभारी घेतलेली पिक आता पावसामुळे उध्वस्त झाली आहे यामुळे आर्थिक नुकसान सहन करत असलेल्या शेतकऱ्यावर आता कर्जाच्या डोंगर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे स्थानिक प्रशासनाने अद्याप पंचनामे यांची कारवाई सुरू केली केली नसल्याचे सांगण्यात येत असून शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्याने केली आहे दरम्यान मुखेड व तालुक्यातील सर्वोच्च महसूल मंडळात गावांमध्ये ढगफुटी नंतर नाल्यांना पूर आल्याने काही रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली आहे अनेक लहान पुलावरून पाणी वात असल्यामुळे नागरिकांनी सावधान राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________

0/Post a Comment/Comments