नांदेडच्या वाघाने आझाद मैदानाच्या पाठिमागील चर्चगेटला जाणारा रोड बंद केला

लोकनेता न्यूज नेटवर्क

मुंबई :- 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर मा.मनोज दादा जरांगे उपोषणाला बसले असता शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ नांदेडच्या मराठा सेवक सुरेश घोरबांड, पंडित पवळे, अरुणा पवळे सह अश्या असंख्य वाघाने बंद केला आझाद मैदाना कडून चर्चगेट रेल्वे स्टेशनला जाणारा रस्ता बंद पडला. शासनाने परिसरातील पिण्याचे पाणी, चहा, फराळ अथवा परिसरातील सर्व दुकाने बंद करावयास लावून सरकारने केल्याचे दिसून आले. आजाद मैदानावर येणाऱ्या आंदोलकाच्या जाणिवपुर्वक गैरसोय करण्यासाठी मैदानापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर वाहने अडून ठेवण्यात आली त्यामुळे येणाऱ्या आंदोलकांना नाहक त्रास देण्यात आला. या साऱ्या गैरसोयीमुळे आंदोलक कंटाळून परत जावे या हेतूने शासनाने उचललेले  पाऊल  दिसून आले. पाण्या पावसातही आंदोलकाचा खूप मोठा उत्साह याप्रसंगी दिसून आला. याप्रसंगी आंदोलकांनी खा. बजरंग बाप्पा सोनवणे सह आझाद मैदानावर आलेल्या अनेक लोकप्रतिनिधीच्या कानावर ही बातमी घालून शासनाचा निषेध व्यक्त केला.

________________________

0/Post a Comment/Comments