लोकनेता न्युज नेटवर्क
बारूळ :- जीवनात आत्मविश्वास व प्रयत्नातील सातत्य ठेवल्यास यश आपल्याकडे आपोआप येते त्यासाठी विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी आपल्या जीवनात यश मिळवायचे असल्यास आत्मविश्वास व कठोर परिश्रम करावे असे आवाहन आफ्रिका खंडातील टांझनिया या देशातील किलोमांजारो या उंच शिखरावर तिरंगा फडकविणाऱ्या व उस्मान नगर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सौ लोपामुद्रा कुबडे यांनी उस्माननगर येथील पत्रकार भवनात आयोजित सत्कार व वाढदिवस कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना केला.
दिनांक ३० रोजी उस्माननगर येथील ग्रामीण पत्रकार भवनात धाडसी महिला सौ लोपामुद्रा, राज्य पुरस्कार प्राप्त पत्रकार संभाजी कांबळे यांचा सत्कार व बहुजन रत्न जीवनगौरव पुरस्कार व वाढदिवसानिमित्त पत्रकार लक्ष्मण कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
१५ ऑगस्ट रोजी किलोमांजारो या शिखरावर भारताचा तिरंगा ध्वज फडकवल्याबद्दल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सौ. लोपामुद्रा कुबडे यांचा सत्कार सर्व पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार एस पी जाधव यांचे हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन करण्यात आला .
यावेळी संपादक बाजीराव पाटील कळकेकर,गजानन देवणे, शिवकांत डांगे, दैनिक युगांतर कंधार तालुका प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे, शुभम डांगे, गौरवडेवाले ,पो. कॉ. ज्योती सांगवीकर इसादकर, नामदेव तारू, लक्ष्मण कांबळे, विलास कांबळे, पत्रकार संघाचे सचिव प्रदीप देशमुख अधि पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरेख व संपूर्ण संचलन सूर्यकांत माली पाटील यांनी केले तर आभार श्री आंबेकर यांनी मानले.
________________________
Post a Comment