कृषि विज्ञान केंद्र,पोखर्णी, नांदेड-1 च्या तर्फे गाजर गवत निर्मूलन जनजागृती अभियान मौजे सायाळ येथे संपन्न

लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड :- भा. कृ. अ.नु. प. तण संशोधन कार्यालय जबलपूर, म. प्र. यांच्या अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी नांदेड, यांच्यामार्फत सरस्वती माध्यमिक विद्यालय सायाळ येथे  20 वा गाजर गवत जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानात शाळेतील 45 विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.
         सदरील कार्यक्रमाचे आयोजन कृ. वि.कें.चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.  कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी नांदेड च्या डॉ. ए.एम.क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ ) यांनी अभियानाविषयी थोडक्यात प्रस्तावना सादर केली त्यात गाजर गवत जनजागृती अभियान का राबवणे आवश्यक आहे व त्यापासून होणारे नुकसान यावर प्रकाश टाकला. त्यानंतर प्रा. एस. एच.जायभाये कृ. वि. के. पोखर्णी, यांनी गाजर गवत म्हणजे काय ते भारतात कसे आले व त्यापासून होणारे नुकसान,रोग व त्यावर घेण्यात येणारे उपाय, व गाजरगवताचे निर्मूलन करताना घ्यावयाची काळजी  याबद्दल सखोल असे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. तसेच गृह विज्ञान तज्ञ प्रा ए एस पवळे यांनी गाजर गवताचे महिलांच्या आरोग्यावर तसेच मुलांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जसे कि अस्थमा, त्वचारोग आणी एलर्जी  यावर माहिती दिली. त्यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सरस्वती माध्यमिक विद्यालय,सायाळचे मुख्याध्यापक श्री. गच्चे एम एस सरांनी केले. शाळेचे इतर शिक्षक श्री जाधव एम. आर. व श्री. कदम आर. ए. यांचे तसेच कृ.वि. कें. पोखर्णी च्या अल्का पावळे कर्मचारी श्री राहुल राऊत व संतोष वाघमारे यांचे ही कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.
________________________

0/Post a Comment/Comments