नांदेड | बाजीराव पाटील कळकेकर :- सौ.सुनिता अशोकराव डावकोरे अध्यक्षा श्री बालाजी फिल्डवेल सोसायटी लि.पेठवडज ता.कंधार जि.नांदेड यांनी उद्योजकतेची कास धरून आपल्या भागातील तरूण तरूणींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन मोठे सामाजिक कार्य केले आहे.उद्यमशीलतेतून त्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.त्यांच्या या जिद्दीबदल व यशासाठी समाजाच्या वतीने प्रातिनिधीक स्वरुपात त्यांच्या कार्यास कृतज्ञतापूर्वक सन्मानित करण्यात आले.त्यांना उद्योजकता कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात आले.पुरोगामी विचारांचे दैनिक एकमत पेपर च्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष मंगेश देशपांडे व्यवस्थापकीय संपादक दैनिक एकमत, प्रमुख पाहुणे मनोहरजी चासकर कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, शहाजी उमाप विशेष पोलीस महानिरीक्षक, राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड, डॉ. महेशकुमार डोईफोडे आयुक्त नांदेड महानगरपालिका, अबिनाशकुमार पोलीस अधीक्षक नांदेड, डॉ.सुधिर देशमुख अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, डॉ. सुरेश सावंत साहित्यिक,सौ. सविता कंठेवाड उद्योजक, यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापुसाहेब तुप्पेकर किनवट प्रतिनिधी दैनिक एकमत यांनी केले.सौ.सुनिता अशोकराव डावकोरे यांचे पेठवडज व परीसरात सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
________________________

Post a Comment