नांदेड :- लोहा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटन विस्तार मोहिमेत एक महत्वाचा टप्पा पार झाला आहे. नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी योगेश्वर कशिनाथराव मोरे यांची तर लोहा तालुका अध्यक्षपदी गोविंद हरिराम पाटील मडकीकर यांची निवड करण्यात आली आहे.
ही निवड जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विचारधारेचा प्रसार आणि पक्षविस्ताराचे काम अधिक जोमाने करण्यासाठी या नियुक्त्या झाल्या आहेत.
या निवडीमुळे नांदेड जिल्ह्यातील मनसेचा झेंडा आणखी बुलंद होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. नवीन पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील मनसेची ताकद वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
________________________

Post a Comment