नांदेड | बाजीराव पाटील कळकेकर :- पोखरभोसी ता. लोहा येथील कष्टकरी... शेतकऱ्यांच्या घरात जन्मलेले लक्ष्मण कांबळे यांचे शिक्षण गावातील जि.प. शाळा व बाहेर झाले. मुर्ती लहान.... पण किर्ती महान... अशी वृत्तीने झपाटलेले लक्ष्मण कांबळे यांनी घराची लक्ष्मण रेषा ओलांडून स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी सतत मेहनतीने पुढे जात राहिले. प्रत्येक क्षेत्रातील कामे करत.... उस्माननगर येथील जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृहात जागा रिक्त होती. संचालक धम्मानंद अर्जुनराव कांबळे यांनी लक्ष्मण कांबळे यांच्यातील कला, व काम करण्याच्या पद्धतीने मोहून घेतले. त्यांना तात्काळ कामावर घेतले. उस्माननगर येथील जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृहात पाचवी ते दहावी पर्यंतच्या। विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था आहे. या वसतीगृहात खुप लांब लांब गावची मुल मुक्कामाला असतात. त्यांच्या जेवणाची व अभ्यासाची उत्तम प्रकारे बारकाईने लक्ष देऊन आपल्या मुलाप्रमाणे संस्कार देतात. उस्माननगर येथील जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतीगृहात कर्मचारी पोखरभोसी ता. लोहा येथे जन्मलेले लक्ष्मण रोहीदास कांबळे यांनी उस्माननगर परिसरात मित्र परिवार निर्माण करून पत्रकारीता क्षेत्रात सामाजिक जाणीव जोपासत कार्यरत आहेत. हे विशेष २००४ पासून पाचवी ते दहावीच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांत कुटुंबासह रममाण होणारे कांबळे गावात मीतभाषी व प्रेमळ, हाकेला ओ देणारे व्यक्तीमत्व म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत., वडील, व भावाची शिकवण संस्कार यामुळे सर्वांशी प्रेमाने सुसंवाद निर्माण करतात. पत्रकारीतेची सुरुवात वसतीगृहाचे संचालक धम्मानंद अर्जुनराव कांबळे हे संपादक असलेल्या दैनिक नंदीग्राम शांतीयोद्धा या वर्तमान पत्रातून सुरु केली. समाजातील उद्भवणाऱ्या प्रश्नाना वाचा फोडण्यासाठी त्यांनी दैनिक श्रमिक एकजूट नांदेड या वृतमानातून पत्रकारीतेला सुरूवात केली. पत्रकारीतेच्या माध्यमातून परिसरात आपुलकी चे जाळे निर्माण करून मित्र परिवार निर्माण केला. उस्माननगर व पासिरातील गावांतील अनेक सामाजिक व विकासात्मक कामांना प्रसिद्धी दिली. पुणे येथून प्रसिद्ध होणाऱ्या संपादक डि.एस. लोखंडे पाटील यांच्या दैनिक चालु वार्ता व श्रमिक एकजूट या दैनिकातून विविध प्रकारच्या समाजउपयोगी दिशादर्शन बातम्यांना प्रसिद्धी देवून पत्रकारितेचा वेगळा ठसा निर्माण केला आहे. त्यांनी अनेक विकासात्मक प्रश्नांना प्रसिद्धी दिल्यामुळे अनेक गावांतील कामांना गती मिळाल्याची उदाहरणे आहेत. सर्व स्तरांतील लोकांच्या प्रश्नांना लेखनी द्वारे समाजासमोर मांडल्यामुळे मोठा मित्र परिवार उभारण्यात कांबळे यांना यश आले आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव ओळखून उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली. लीनता, सौजन्य, प्रसंगी करारीपणा असलेले पत्रकार कांबळे लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. नुकताच ऋणानुबंध समाज विकास संस्था संचलित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम सुलोचना माहेर घर महिला व लताई अनाथ आश्रम भोकर तालुका चिखली जि.बुलढाणा यांच्या वतीने बहुजन चळवळीत आत्मविश्वासाने आणि जिद्दीने व ध्येय साध्य करणारे तसेच पत्रकारितेच्या व सामाजिक कार्य क्षेत्रामध्ये तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खंबीरपणे उत्तुंग कामगिरी करून बहुजन समाजाच्या कल्याणासाठी सतत धडपड करणाऱ्या कार्याची दखल घेऊन नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील पत्रकार लक्ष्मण कांबळे यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून राज्यस्तरीय बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
वसतिगृहातील लहान मोठ्या विद्यार्थ्यांत सजन रममाण होवूनही पत्रकारिता क्षेत्रात आत्मीयता जपणारे आयु. लक्ष्मण कांबळे निश्चितच कौतुकास पात्र आहेत..... त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.....

Post a Comment