नांदेड :- गेल्या काही दिवसांपासून नांदेडसह आजूबाजूच्या परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू असून या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसले असून त्यांच्या घरांचे अतोनात नुकसान झाले असून घरात पाणी, दारात पाणी,सगळीकडे पाणीच पाणी अशी पुराची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक घरांमध्ये एक ते दोन दिवसांपासून चुली पेटल्या नसून पूरग्रस्त भागातील नागरिकांना उपाशी राहण्याची वेळ आली होती,परंतु नांदेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजूसिंघ जाधव यांच्या वतीने नुरी चौक,मेहबूबनगर,गोविंद नगर यासह शहरातील इतर ठिकाणी अन्नदान वाटप करण्यात आले.सकल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांचे बेहाल होऊन संसार उपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली असून जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेने आमची तात्काळ मदत करावी अशी भावना सकल भागातील पूरग्रस्त नागरिकानी व्यक्त केली.
________________________

Post a Comment