धनेगाव शिऊर धरणातून विसर्गची वाढ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

लोकनेता न्युज नेटवर्क

निलंगा|इस्माईल शेख :- मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी आज, 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता मांजरा धरणाचे गेट क्रमांक 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे सहा गेट आणखी 0.25 मीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या धरणाच्या सांडव्यातून या सहा गेटमधून 0.75 मीटर उंचीने पाण्याचा विसर्ग सुरू असून, मांजरा नदीपात्रात 15,724.26 क्युसेक्स (445.32 क्युमेक्स) इतका विसर्ग होत आहे. त्यामुळे धनेगाव शिऊर च्या धरणाचे सात ही दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाण्याचा विसर्ग जास्त असल्यामुळे  वाहतूक पुलावरुन पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे मध्य रात्री पासून वाहतूक विस्कळीत झाली आहे. निलंगा उदगीर रस्ता  पुर्णतः बंद करण्यात आली आहे. तलाठी रूपनर विजयकुमार विठ्ठलराव आणि बिट अंमलदार नितीन मजगे  आणी  बालाजी विभते हे विसर्ग कमी होई पर्यंत विशेष सहकार्य असेल. तशेच तहसीलदार कुलकर्णी प्रसाद, डेपोटी कलेक्टर शरद झाडके, मंडळ अधिकारी सोमवंशी सर यांनी धावती भेट घेऊन पाहणी केली. तसेच दिनकर बिरादार (दाजी), सय्यद इक्रार, वसंत पाटील या गावकऱ्यांचे प्रशासनास विशेष सहकार्य लाभले.  तसेच   नूरपशा सय्यद, आणि डिगंबर काळे ( पंचायत शेवक) यांनी मध्य रात्रीपासून प्रशासनास सहकार्य करत आहेत.
      धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार विसर्ग वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे नदीकाठावरील आणि पूरग्रस्त भागातील गावांमधील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन मांजरा प्रकल्प धनेगाव पुरनियंत्रण कक्षाने केले आहे.
________________________

0/Post a Comment/Comments