निलंगा|इस्माईल शेख :- याबाबत अधिक माहिती अशी की, गणेशोत्सवाचे अनुषंगाने लातूर शहरात दि.१७/०८/२०२५ रोजी श्री. गणेशाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव हा डीजे / डॉल्बी मुक्त करणेबाबत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सर्व गणेशमंडळा चे पदाधिकारी व भक्तांना मिरवणुकीमध्ये डीजे /डॉल्बी न लावणे विषयी आवाहन करण्यात आलेले होते. त्याला प्रतीसाद देत अनेक गणेश मंडळांनी पारंपारीक वाद्यांना संधी उपलब्ध करून देत डीजे /डॉल्बीला नाकारले आहे. तसेच लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे आपले लातूर सुरक्षित लातूर अभियान राबवून गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले होते.
लातूर जिल्हा पोलिसांच्या सीसीटीव्ही लावण्याच्या आवाहनाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत ६१ गणेश मंडळांनी २७४ सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत व अजून १२३ गणेश मंडळ ४७८ कॅमेरे लावणार आहेत. श्री गणेशांचे विसर्जन झाल्यानंतर सदरील कॅमेरे शहरात महत्त्वाच्या चौकात, गावामध्ये कायमचे लावून आपल्या लातूरची सुरक्षा वाढविण्यास हातभार होणार आहे. सदर कॅमेऱ्याची देखभाल गणेश मंडळांनी करावयाचे आहे.
तथापी काही गणेश मंडळांनी डीजे/डॉल्बीचा वापर करून ध्वनीप्रदुषन कायद्याचे उल्लंघन केले आहे.
गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील ०५, शिवाजी नगर पोलीस स्टेशन हद्दीतील ०३ व एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील ०२, पोलीस स्टेशन मुरुड हद्दीत ०४, पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण हद्दीतील ०१ व पोलीस स्टेशन अहमदपूर हद्दीतील ०१ अशा एकुण १६ मंडळांनी ध्वनीप्रदुषण कायद्याचे उल्लंघण केल्याचे आढळुन आल्याने त्यांचेवर प्रचलीत कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहे.
पुढील गणेश मंडळावर ध्वनी प्रदूषण नियमांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
पोस्टे शिवाजीनगर हद्दीतील
१) एकता गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर.
२) महाराजा गणेश मंडळ,छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर.
३) ओडिया राज गणेश मंडळ, ओडिया राज चौक, लातूर.
पोस्टे एमआयडीसी हद्दीतील
४) जय बजरंग गणेश मंडळ, आर्वी गायराना लातूर.
५) सूर्या गणेश मंडळ, एमआयटी कॉलेज जवळ, लातूर.
पोस्टे गांधी चौक हद्दीतील
६) जय हो मोरया गणेश मंडळ, सुळ गल्ली, लातूर
७) रामलिंगेश्वर गणेश मंडळ, काळे गल्ली, लातूर
८) वीर तानाजी गणेश मंडळ, गडदे गल्ली, लातूर
९) सरदार वल्लभभाई पटेल गणेश मंडळ, पटेल चौक, लातूर
१०) साईबाबा गणेश मंडळ, मिस्किनपुरा, लातूर
पोस्टे उदगीर ग्रामीण हद्दीतील
११)बाल गणेश मंडळ, समता नगर उदगीर,
पोस्टे अहमदपूर हद्दीतील
१२) पंजोबा गणेश मंडळ, पाटील गल्ली अहमदपूर.
पोस्टे मुरुड हद्दीतील
१३) मुरुडचा महाराजा गणेश मंडळ, बस स्थानक समोर, मुरुड.
१४) शिव क्रांती शिव क्रांती गणेश मंडळ, भाजी भाकरी नगर, मुरुड.
१५) जगदंबा गणेश मंडळ जगदंबा गणेश मंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, चौक मुरुड.
१६) शंभूराजे गणेश मंडळ, बसवेश्वर चौक, मुरुड. असे आहेत.
अशाप्रकारे वरील नमूद गणेश मंडळांच्या डीजे/डॉल्बी चालकांवर पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम १५ अन्वये ५ वर्षाचा कारावास व १ लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कार्यवाही करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच यापुढे कोणत्याही सण उत्सव, जयंती दरम्यान, गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान पारंपारिक वाद्यांचा वापर करण्यात यावा डीजे/ डॉल्बी चा वापर कोणीही करू नये असे लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने परत एकदा आवाहन करण्यात येत आहे.
________________________

Post a Comment