लोकनेता न्युज नेटवर्क
खंडाळा : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित भादे येथे लहुजी शक्ती सेना व साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने राजकारण, समाजकारण कला या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना सन्मानीत करण्यात आले यात मोर्वे ता. खंडाळा गावच्या सुकन्या व सातारा पंचायत समितीच्या सदस्या, सौ अलका बोभाटे मॅडम जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी लहुजी शक्ती सेना सातारा यांना समाजरत्न तर खेड ता. सातारा ग्रामपंचायतीचे उपसरपंच कांतीलाल कांबळे व अंदोरी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संतोष सुतार यांना समाजभूषण आणि प्राजक्ता सकटे यांना कलारत्न पुरस्कार मधुताई कांबळे सदस्या, जि. प. सातारा, शारदा ताई जाधव जिल्हाप्रमुख शिवसेना,भूषण शिंदे तालुकाप्रमुख, शिवसेना अशोक धायगुडे पाटील मा.उपसरपंच अंदोरी संभाजी आण्णा साळुंखे युवा नेते,देविदास चव्हाण तालुका अध्यक्ष भाजपा शरद काका देशपांडे बाळासाहेब साळुंखे,कैलास भिसे उपसरपंच अंदोरी दत्तात्रय सपकाळ शिंदेवाडी वंदना भिसे मा. सरपंच अंदोरी, रजनीकांत सोनावणे, अविनाश खुंटे,शशिकांत जाधव पोलीस पाटील जवळे जयश्री खुंटे पोलीस पाटील भादे यांचे उपस्थिती मध्ये प्रदान करण्यात आला त्या अगोदर चंद्रकांत यादव साहेब सदस्य, पंचायत समिती खंडाळा यांचे हस्ते साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे व क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर,मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या सावित्रीमाता फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्व महापुरुषांची भव्य मिरवणूकीचा शुभारंभ करण्यात आला सदर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव व शोभाताई बाळासाहेब जाधव सदस्या, पंचायत समिती खंडाळा यांनी सर्वांचे स्वागत केले यावेळी मधुताई कांबळे सदस्या, जि. प. सातारा शारदाताई जाधव जिल्हाप्रमुख शिवसेना, युवा नेते अशोक धायगुडे पाटील व भाऊसाहेब साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी राजकीय सामाजिक कामातील योगदान दिल्याबद्दल लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव व पंचायत समिती सदस्या सौ शोभाताई बाळासाहेब जाधव यांचा सत्कार भादे ग्रामस्थांचे वतीने युवा नेते संभाजी आण्णा साळुंखे जेष्ठ नेते शरद काका देशपांडे जेष्ठ नेते बाळासाहेब साळुंखे भाऊसाहेब साळुंखे यांनी केला तर खंडाळा तालुक्यातील मोर्वे गावचे यशवंत सपकाळ यांची सुकन्या व तासगाव गणाचे कार्यक्षम नेतृत्व सातारा पंचायत समितीच्या सदस्या सौ अलका बोभाटे मॅडम यांना समाजरत्न हा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मोर्वे आणि मुळीकवाडी तासगाव परिसरातील व जिल्हातून सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच खेड ग्रामपंचायतीचे उपासरपंच व खेड जिल्हापरिषद गटाचे युवा नेते कांतीलाल कांबळे व अंदोरी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संतोष सुतार यांना समाजभूषण तर रील स्टार व मराठी सिनेमा कोयता फेम प्राजक्ता सकटे यांना कलारत्न पुरस्कार मिळालेबद्दल सर्वांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला त्या नंतर नव महाराष्ट्र माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या व सहभागी स्पर्धकांना मान्यवरमच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले व भादे प्रीमियम लीग मधील प्रथम विजेता संघमालक बाळासाहेब जाधव यांचा सरकार फायटर्स या संघातील खेळाडूंचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी जगन्नाथ जाधव गुरुजी, शंकर जाधव, पोपट जाधव, सोमनाथ सोनावणे, निवृत्ती जाधव,योगेश जाधव, कुंडलिक जाधव, सुरेश जाधव, शांताराम जाधव, लालासाहेब जाधव, अक्षय भिसे विजय जाधव, सनी जाधव, विशाल जाधव,राहुल जाधव, आकाश जाधव,राजू जाधव, राम जाधव, प्रविण जाधव,मनोज जाधव, करण जाधव अध्यक्ष , शंभूराज जाधव, दीपक जाधव,चंद्रकांत जाधव, अमृत जाधव सुनिल सोनावणे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment