सेनगाव तालुक्यात बाप्पाचे जल्लोष आगमन

सेनगाव शहरात बाप्पाच्या सजल्या बाजारपेठा 

लोकनेता न्यूज नेटवर्क

सेनगाव|महादेव हरण :- हिंदू संस्कृतीमध्ये गणरायाला मोठे स्थान असल्याने देशामध्ये सर्वत्र गणरायाचे आगमन मोठ्या थाटामाटात होते यावर्षी गणरायाचे आगमन मोठ्या थाटामाटात होत असून सेनगाव तालुक्यामध्येही बाप्पाचे आगमन मोठ्या थाटामाटा होत आहे सेनगाव शहर मोठे बाजारपेठ असल्याने गणरायाच्या आगमनासाठी बाजारपेठही मोठ्या सजलेल्या पाहायला मिळत आहे प्रत्येकाच्या घरोघरी गणरायाचे आगमन होत आहे रंग रांगोळी घरामध्ये काढून गणरायाची आरती करून मोदकाचा निवड दाखवल्या जातो सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळते आज सकाळपासूनच सेनगाव शहरांमध्ये बाप्पांना घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्याचबरोबर बाजारपेठा ही मोठ्या प्रमाणात सजल्या होत्या गणरायाचे आगमन दिनांक 27 ऑगस्ट ला सकाळी अकरा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत मंडळाकडून गणरायाचे स्थापना करण्यात येत आहे.
________________________

0/Post a Comment/Comments