सेनगाव पोलिसांचा जलद तपास; पीडित मुलीला न्याय

लोकनेता न्यूज नेटवर्क

सेनगाव | महादेव हरण :- तालुक्यातील आडोळ येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि दुसऱ्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक 'दीपक मस्के' यांच्या नेतृत्वाखाली केवळ ताब्यातच घेतली नाही, तर न्यायालयात दाखल करण्याची तजबीज ठेवली आहे. सेनगाव तालुक्यातील या संताप जनक घटनेत पोलिसांनी दाखविलेली गतिशीलता उल्लेखनीय ठरत असून जिल्हाभरात याचे कौतुक होत आहे.
         फुस लावून अल्पवयीन मुलीला पळवणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक. तात्काळ व सक्रिय तपासामुळे हरवलेली अल्पवयीन मुलगी सुरक्षित सापडली,ऑपरेशन मुस्कान प्रमाणे मुलीच्या चेहऱ्यावर हसू ,महिला व मुलीच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर याचा प्रत्यय सेनगाव पोलिसांनी दाखवून दिला. केवळ 48 तासात तपास करून आरोपीस तात्काळ अटक केली.
        या कारवाईने सेनगाव पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, अल्पवयीन मुलीवर हात टाकणाऱ्यांना कायदा क्षणार्धात गजाआड करतो, महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची शून्य सहनशीलतेची नीती आणि झपाटलेला तपास यामुळे पीडित आणि गरिबांना दिलासा मिळत असून समाजात कायद्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
     पोलीस स्टेशन सेनगाव येथील गु. र.नं. 410/ 2025 कलम 137/2 बी.एन.एस.मधील पीडित मुलगी हिचा गुन्हा दाखल होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सेनगाव पोलिसांनी दोन पथक तयार करून घटनास्थळ आडोळ,औंढा, हिंगोली येथे शोध घेऊन तात्काळ 24 तासात पीडित मुलीस ताब्यात घेतले आहे.गुन्ह्यातील मुख्य आरोपीस कनेरगावनाका येथून अटक केली आहे. तसेच गु.र.नं.409/2025 विनयभंग गुन्ह्यामधील आरोपीस सुद्धा तात्काळ नरसी नामदेव येथून अटक करून 48 तासात तपास करून दोषारोप माननीय न्यायालय दाखल करण्याची तजबीज ठेवली आहे.सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक "श्रीकृष्ण कोकाटे", माननीय अप्पर पोलीस अधीक्षक "श्री कमलेश मीना साहेब", एस.डी.पी.ओ.हिंगोली ग्रामीण उपविभाग "श्री राजकुमार केंद्रे" साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक "दीपक मस्के" पी.एस.आय. रविकुमार खंदारे, पी.एस.आय. नागनाथ पाटील, हेड कॉन्स्टेबल तुळशीराम वंजारी,एन.पी.सी. एकनाथ राठोड,पोलीस कॉन्स्टेबल ओमकांत राठोड, एल. पी. सी. प्रियांका गिराम यांनी पीडित मुलींना तात्काळ न्याय मिळावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तपास केल्यामुळे अति जलद गतीने कार्यवाही व आरोपी अटक. चार्जशीट न्यायालयात दाखल केल्यामुळे सेनगाव पोलीस दलाचे अभिनंदन सर्वतोपरी होत आहे.ही जलद गती कामगिरी पोलिसांच्या कौशल्याचे आणि संवेदनशील गुन्ह्याकडे पाहण्याच्या गंभीरतेचे दर्शन घडवते.
________________________

0/Post a Comment/Comments