जिल्ह्यातून होत आहे कौतुकाचा वर्ष
सेनगाव|महादेव हरण :- शहरातील रहिवाशी असलेली कु. भाग्यश्री दत्तराव कांबळे हिचे स्पर्धा परीक्षेत घवघवी यश मिळाल्याने सेनगाव शहरातील समता नगर परिसरातील कन्या कु. भाग्यश्री दत्तराव कांबळे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अरजपत्रित गट (ब )व गट (क )संयुक्त परीक्षेत यश मिळविले आहे. या द्वारे तिची अन्न पुरवठा विभाग जिल्हा कार्यालय, वाशिम येथे लिपिक पदावर निवड झाली आहे. भाग्यश्री हिचे वडील स्व. श्री दत्तराव कांबळे सर हे सेवानिवृत्त उच्चश्रेणी मुख्याध्यापक होते, तर आई इंदुबाई कांबळे लेडीज टेलर आहेत. सातत्यपूर्ण अभ्यास आणि ठरवलेली दिशा यामुळे हे यश शक्य झाले असे भाग्यश्री हिने सांगितले. या यशाबद्दल भाग्यश्री हिचा ठिकठिकाणी सत्कार देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे.
________________________

Post a Comment