शिराढोण | लक्ष्मण पांडागळे :- दि.२७ ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शिराढोण व गोळेगाव पूर्ण पाण्याखाली गेले असून येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून जनतेचे जनजीवन विस्कळीत झालेले पहावयास मिळते.
तसेच शेतातील सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्याला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला पहावयास मिळतो. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून शेतकऱ्यांना आर्थिक मदत. व शंभर टक्के पिक विमा मंजूर करून दिला पाहिजे. तरच शेतकरी या ओला दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडू शकतील.
________________________

Post a Comment