सिंदखेड राजा :- पर्यावरण संवर्धन व रुग्णांना निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सारथ्य फाउंडेशन व जिजामाता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने व सामाजिक वनीकरण परीक्षेत्र सिंदखेड यांच्या सहकार्याने जिजामाता हॉस्पिटल महिला आरोग्य केंद्र मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
झाडे ही केवळ सावली देणारी नाही तर ती आरोग्याचा खरा श्वास आहेत.हॉस्पिटल परिसर हिरवा गार केल्यास रुग्णांना मानसिक शांती व शुद्ध हवा मिळेल या उद्देशाने सदरील रुग्णालयामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
सदरील वृक्षारोपणामध्ये पिंपळ,कडुलिंब,आवळा,जांभूळ,अशोक,चिंच,आपटा, गुलमोहर यांच्यासह विविध जातींचे जातींचे १५० हुन अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली असून सदरील कार्यक्रमासाठी म.से.संघाचे विधि सल्लागार अॅड. राजेंद्र ठोसरे,ह.भ.प. ज्योतीताई जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा उर्मिलाताई हाडे,म.से.संघाचे तालुकाध्यक्ष मधुकरराव गव्हाड,आऊसाहेब जिजाऊ फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बालाजी कळकुंबे,मानव विकास प्रतिष्ठान बुलढाणा चे अध्यक्ष डॉ. रत्नाकर किंगर, जिजाऊ महिला अर्बनचे प्रा.निलेश बंगाळे, डॉ .सुभाष खांदवे,सामाजिक वनीकरण परीक्षेत्र सिंदखेड राजा चे जी.के,मिसाळ,आर.बी.वाघ, अर.बी.शिवरकर,व्ही.एल.वाघ,सारथ्य फाऊंडेशनचे गोपाल देवकर,जिजामाता हॉस्पिटलचे समाधान देशमुख यांच्या सह डॉक्टर तथा कर्मचारी उपस्थित होते.
________________________

Post a Comment