विद्यार्थ्यांनी ध्येय्य निश्चित करून शिकावे!-श्री परमेश्वर कदम

लोकनेता न्युज नेटवर्क

सोनपेठ :- येथील कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयात संपन्न झालेल्या दिक्षारंभ: विद्यार्थी प्रेरण कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना श्री परमेश्वर कदम बोलत होते. दिनांक २६ ऑगस्ट २०२५ मंगळवार रोजी कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने दिक्षारंभ: विद्यार्थी प्रेरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री परमेश्वर कदम साहेब उपस्थित होते. स्वामी रामानंद तीर्थ प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे म्हणून दै.पुण्य नगरीचे पत्रकार श्री गणेश पाटील, संस्थेचे कोषाध्यक्ष श्री रामेश्वर कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत सातपुते आणि प्रो.डॉ.बाळासाहेब काळे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये यांनी करतांना विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या जीवनाचा आदर्श समोर ठेऊन काही नाही होता आले तरी माणूस होण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. या प्रसंगी श्री रामेश्वर कदम यांनी त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने महाविद्यालय ग्रंथालयास ग्रंथ दान करून वाढदिवस निमित्ताने ग्रंथ दान या बेस्ट प्रक्टिसला प्रोत्साहन दिले. प्रातिनिधिक स्वरुपात प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कु.वैष्णवी पाटील आणि कु.पूनम रोडे यांनी मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ.वसंत सातपुते यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करतांना महाविद्यालयाची आचार संहीता सांगितली. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना भिंतीवर व्यक्त होण्याऐवजी महाविद्यालयाचा वार्षिकांक प्रज्ञा मध्ये लिहावे. तसेच रासेयो, क्रीडा विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्या विविध स्पर्धा आणि कलाप्रकारामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी स्वतःचासर्वांगीण विकास करून घ्यावा. त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे बदललेल्या श्रेयांकन आणि गुणांकन पद्धतीला सामोरे जाण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे श्री गणेश पाटील यांनी माणुसकी हरवत चालली असतांना विद्यार्थ्यांनी आपले धेय्य आणि चिकाटी न सोडण्याचे आवाहन करतांना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री परमेश्वर कदम यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाच्या आर्थिक अडचणी किती क्लिष्ट आहेत हे सांगतांना आपली अडचण आम्हाला सांगा, संस्था, महाविद्यालय अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करेल असे सांगतांना विद्यार्थ्यांनी काही तरी ध्येय्य निश्चित करून शिकल्यास माणूस काहीतरी होतो असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो.डॉ.मुक्ता सोमवंशी यांनी तर आभार प्रो.डॉ.बालासाहेब काळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ.वनिता कुलकर्णी, डॉ.विकास रागोले, प्रा.संदीप देवराये, डॉ.गोविंद वाकणकर, डॉ.अनंत सरकाळे, प्रा.अर्जुन मोरे, संतुक परळकर, संतुक कुलकर्णी, चंद्रपाल पटके यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
________________________

0/Post a Comment/Comments