उमरी|किशनराव गायकवाड :- उमरी तहसील कार्यालयातील तत्कालीन तहसीलदार प्रशांत थोरात यांची रेणापूर येथे बदली झाली होती. तेंव्हा निरोप समारंभाच्या दिवशी तहसील कार्यालयात खुर्चीवर बसून गाणे गायीलेले आहे. त्यांच्यावर असा ठपका ठेवून जिल्हाधिकारी नांदेड यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात शिफारस केल्यामुळे महसूल मंत्री यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. त्यांचे निलंबन मागे घ्यावे. म्हणून अशा प्रकारचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी निमंत्रीत सदस्य तथा पत्रकार किशनदादा गायकवाड कुदळेकर यांनी मुख्यमंत्री, देवेन्द्रजी फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे व जिल्हाधिकारी नांदेड इत्यादींना दि १९ आँगस्ट रोजी उमरीचे तहसीलदार मंजुषा भगत यांचे मार्फत निवेदन देण्यात आले आहे.
आणि निवेनात असे म्हटले आहे की, उमरी तहसील कार्यालयात कार्यरत असतांना तहसीलदार प्रशांत थोरात यांनी तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांचे तळमळीने काम केलेले आहे. निराधार, पिडीत व अन्याय्यग्रस्तांना अन्न, वस्त्र व निवारा मिळवून दिलेला आहे. यामुळे उमरी तालुक्यात ते लोकप्रिय झालेले असुन उमरी तालुक्याला लाभलेले तहसीलदार या रूपाने देवदुतच लाभलेले होते. गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करीत होते. यांमुळे ते तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी वाटत नव्हते तर जनतेला मित्रा प्रमाणे वाटत होते. सर्वा सोबत मिसळून राहत होते.जनसामान्य जनतेच्या सुखा दुःखात सहभागी होत होते. त्यांच्या कार्यकाळात शेतकरी व जनसामान्य नागरीकांचे कामे वेळेवर होत होती. उमरीत या अगोदर असा तहसीलदार आला नाही. यापुढे येणार नाही. उमरी तालुक्यातील जनतेमध्ये अशी चर्चा ऐकायला मिळत होती. यामुळे उमरी तालुक्यातील जनता व कर्मचारी त्यांचा आदर करीत होते.
त्यांचे तीन वर्षे पूर्ण झालेले नव्हते तरी महाराष्ट्र शासनाकडून त्यांची बदली करण्यात आली होती. आणि उमरी जि नांदेड येथुन रेणापूर जि लातूर येथे पाठविण्यात आले होते. यानिमित उमरी येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दि ८ आँगस्ट रोजी तहसील कार्यालयात निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. सदरील कार्यक्रमात तहसीलदार प्रशांत थोरात यांनी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या प्रेमाला व सत्काराला भारावून जाऊन ही दोस्ती कधी तुटणार नाही. आणि आपण केलेल्या सहकार्याला मी कधी विसरणार नाही. खुर्चीवर बसून अनावधानाने गाणे गायीलेले होते. परंतु ही जाणुन बुजुन चुक केलेली नाही. किंवा या गाण्यामुळे जनतेचे किंवा शासनाचे फार मोठे नुकसान झालेले नाही. त्यांच्या हातुन कोणाचेही नुकसान झाले नाही की, कोणता भ्रष्टाचार झाला नाही. तरी खुर्चीवर बसून गाणे गायीलेले आहे असा ठपका ठेवून त्यांना निलंबित करून निस्वार्थी व ईमानदार तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित करून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. परंतु महाराष्ट्र राज्यातील महसूल व इतर कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी हे सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करतात, त्यांची आर्थिक लुबाडणूक करतात. त्यांच्या विरोधात मात्र जिल्हाधिकारी त्यांच्यावर कारवाई न करता त्यांची पाठराखण करताना दिसतात. हा कोणता न्याय आहे ? चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यात आली आहे. किशनदादा गायकवाड यांनी निवेदनात असे म्हटले असुन रेणापूर येथे बदली होऊन गेलेल्या तहसीलदार यांनी गाणे गाऊन चुक केली असेल तर त्यांना नोटीस देऊन बाजु मांडण्याची संधी न देता निलंबित करण्याची शासनाकडे शिफारस करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या मागे काही तरी षडयंत्र आहे. किशनदादा गायकवाड यांनी शंका व्यक्त केली असून उमरी तालुक्यातील जनता तहसीलदार प्रशांत थोरात यांच्या पाठीशी आहे. तडकाफडकी त्यांचे निलंबन केल्यामुळे उमरी तालुक्यातील सर्वसामान्य जनता व कर्मचाऱ्यांमध्ये तिव्र नाराजी पसरली आहे.
यांचा फेर विचार करून रेणापूर येथिल तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबन त्वरित मागे घ्यावे. आणि शेतकरी व जनसामान्य नागरीकांचे कामे वेळेवर करण्यासाठी त्यांना कामावर घेऊन परत एकदा संधी द्यावे. अशा प्रकारचे निवेदन समाजभूषण किशनदादा गायकवाड कुदळेकर, पत्रकार तथा प्रदेश कार्यकारिणी निमंत्रीत सदस्य भारतीय जनता १९पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांनी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, व जिल्हाधिकारी नांदेड आदींना मंजुषा भगत, तहसीलदार उमरी यांच्या मार्फत निवेदन पाठवुन मागणी केलेली त्यावेळी सोबत उमरी तालुक्यातील बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.
________________________

Post a Comment