लोकनेता न्यूज नेटवर्क
कुंडलवाडी (गंगाधर दुसलवाड) :- बिलोली देगलूर विधानसभा समन्वयक श्री विपुल पटणे यांच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम ...सध्या तालुक्यामध्ये सगळीकडेच अतिवृष्टीमुळे झालेल्या अतोनात नुकसान लक्षात घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देगलूर बिलोली विधानसभा समन्वयक श्री विपुल पटने यांच्या पुढाकारातून तालुक्याच्या कार्यकारिणीने परिसरातील विविध शाळेतील वर्ग दहावीच्या 50 गरजू विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेची पूर्ण फीस भरून मदतीचा मोठा हात दिला आहे. तालुक्यात अतिवृष्टीमुळे सगळीकडेच पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली पाहून नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे विपुल पटणे यांच्या विचारातून शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षातर्फे परिसरातील विविध शाळेतील वर्ग दहावीच्या एकूण 50 विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षेची प्रत्येकी 660 रुपये फीस भरून मदत केली आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून आज विपुल पटणे यांचा नेतृत्वामध्ये कार्यकारणी चे श्री शंकर कोनेरवार (उप तालुकाप्रमुख बिलोली), शेख जावेद भाई (उप जिल्हाप्रमुख अल्पसंख्यांक), बजरंग साठे (उप जिल्हाप्रमुख युवा सेना), विठ्ठलराव हेमके( शहर प्रमुख कुंडलवाडी), रमेश गवते (उप शहर प्रमुख कुंडलवाडी), नरेश साठे उपशहर प्रमुख कुंडलवाडी तसेच दिगंबर लाडे (शहर संघटक कुंडलवाडी) यांनी मिलिंद विद्यालय कुंडलवाडी येथील दहा गरजू विद्यार्थ्यांची परीक्षा फीस नगद स्वरूपामध्ये संस्थेचे संचालक विजयकुमार लोहगावकर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एच.एन.पांचाळ सर यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी विद्यालयातर्फे सर्वच पदाधिकाऱ्यांचा त्यांच्या उपक्रमासाठी सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेतील ज्येष्ठ स.शि. व्ही.एस.देगावकर, बी.एम.गंगोणे, सी.ए. कुंडलवाडीकर उपस्थित होते. यावेळी विपुल पटणे यांनी इतर पदाधिकाऱ्यांनी सुध्दा अशा पद्धतीने पुढे येऊन विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. विद्यालयातील या लक्षवेधी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच उपस्थितांचे आभार स.शि. अमरदीप दगडे यांनी मानले.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/
.jpg)
.jpg)
Post a Comment