संजयनगरच्या वंचित कुटूंबाना पिटीआर मिळवून देणार---जयसिंग पंडित पिटीआर मिळण्याबाबत मुख्याधिकारी यांना दिले स्मरणपत्र


लोकनेता न्युज नेटवर्क

गेवराई (प्रतिनिधी) :- गेवराई शहरातील संजयनगर मधील वंचित कुटुंबांना पीटीआर मिळवून देण्यासाठी शिवछत्र परिवार कायम प्रयत्नशील आहे. जोपर्यंत सर्वांना अधिकृत पीटीआर मिळत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही असे प्रतिपादन शिव शारदा मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष जयसिंग पंडित यांनी केले. संजय नगर मधील वंचित कुटुंबांना संदर्भात जयसिंग पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना स्मरणपत्र देण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. संजयनगर भागातील अतिक्रमण जागेवर कुटुंबासह राहत असलेल्या, पिटीआर पासुन वंचीत राहिलेल्या लोकांना जागेचा पीटीआर मिळण्याबाबत शिव शारदा मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष जयसिंग पंडित यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी यांना आज स्मरणपत्रासह २४३ प्रस्ताव देण्यात आले.त्याप्रसंगी दादासाहेब घोडके, आवेज शरीफ, दिपक आतकरे , श्याम येवले, सरवरभाई पठाण, सय्यद सुभानभाई, शेख निजाम भाई,सय्यद रफीकभाई, बंटी सौंदलमल, जेके बाबुभाई, विजय सुतार, संतोष सुतार, रंजीत घुंबार्डे, प्रभाकर भालशंकर, संभा कोल्हे, प्रकाश गायकवाड, दिनेश घोडके नारायण पवार, शेख पप्पू, शेख गुड्डू, शेख राजुशेठ, सनाउल्लाखा पठाण, राजेंद्र साळूंके, धम्मा भोले, शेख निजामभाई, नासेर तांबोळी, शेख रहिमभाई, बाबुलाल शेख, शेख नसीर, दिलावर पठाण, मच्छिंद गायकवाड , शेखर राऊत, अजय राऊत, मोहसीन शेख जावेद, शेख शौकत, विवेक वाव्हळ नारायण पवार, शेख युसुफभाई, ऋषीकेश गायकवाड, शाम कोकणे, गणेश बोराडे,सचिन राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments