सुरजागडच्या लोहखनिजाच्या धुळीने नागरिक त्रस्त

लोकनेता न्युज नेटवर्क

गोंडपिपरी | आशिष निमगडे  :- गडचिरोली जिल्ह्याची ओळख स्टील हब अशी निर्माण झाली आहे.मोठ्या प्रमाणात सुरजागड येथून लोहखनिजाची वाहतूक गोंडपिपरी मार्गे होत आहे.अशातच वाहतुकीमुळे वाढलेल्या अपघाताने नागरिकांचा जीव धोक्यात असताना आता लोहखनिजाच्या बारीक कणांमुळे नागरिक त्रस्त असल्याचे दिसत आहे.नवेगाव टोल जवळ मोठ्या प्रमाणात बारीक मातिच्या कणाचा सळा पडला असून पाऊस आला की चिखल निर्माण होऊन असते दुचाकी मोठ्या प्रमाणात घसरताना दिसत आहे. अपघातात अनेकांना दुखापद होत आहे. सामान्य नागरिकांना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन नवेगाव टोल जवळून प्रवास करावा लागत आहे.ऊन असल्यास बारीक कण दुचाकी स्वारांच्या डोळ्यात जात असून वाहणे चालवताना अडचण निर्माण होत आहे.याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केल्या जात आहे.
      तालुक्यात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.परिणामी अपघातात देखील वाढ झाली आहे. सुरजागडच्या वाहतुकीमुळे लोहखनिजाचे बारीक कण मुख्य रस्त्यावर साचून आहे.तात्काळ प्रशासणाने ब्रूमर लाऊन रस्ता साफ करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू...  असे जनसामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे.

0/Post a Comment/Comments