लोकनेता न्युज नेटवर्क
लोहा (संतोष पाटील जाधव) :- नांदेड जिल्ह्यामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये तीन वेळेस अतिवृष्टी झालेली आहे. यामुळे सगळीकडे प्रचंड पाणीच पाणी झाले आहे. शेतकरी हवालदिल झाले असून या भागात ओला दुष्काळ जाहीर करणे, सरसकट पिक विमा मंजूर करणे व शेतक-यांना, नागरिकांना कोल्हापूरच्या धर्तीवर मदत करणे अंत्यत आवश्यक आहे.
1) दि.30 ऑगस्ट रोजी 77 मि.मी. ते 129 मि.मी.ची पावसाची नोंद नांदेड जिल्ह्यात आहे.
2) दि.27 सप्टेंबर रोजी 92 मि.मी. ते 148 मि.मी. पावसाची नोंद नांदेड जिल्ह्यात आहे.
3) दि.28 सप्टेंबर रोजी 86 मि.मी. ते 138.75 मि.मी. पाऊस नांदेड जिल्ह्यात झाला आहे.
नांदेड जिल्ह्यात अक्षरशः पावसाचा रुद्र अवतार होता. नदी नाले पूर्ण भरुन शेत शिवार व गावामध्ये पाणी शिरुन संसार उघड्यावर पडले. गोदावरी नदी, मन्याड नदी व इतर सर्व उपनद्यांना महापुर आला. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेचे प्रचंड हाल झालेले आहे. अनेकांची जनावरे, संसार उपयोगी साहित्य, शेती उपयोगी साहित्य व पिके वाहून गेले आहे. अनेकांची घरे पडली आहेत. जिवित हानी झालेली आहे. काढणीला आलेले पिके पूर्ण पाण्याने वाहून गेले आहे. राहिलेले नासले आहेत. कापूस, सोयाबीन, तुर, उडीद, मुग, ज्वारी, केळी, पपई या सर्व पिकांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. तसेच नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील अनेक भागात नागरिकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर गोदावरी नदीचे पाणी गेले होते. अनेकांची घरे पडून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.त्यास्तव नांदेड जिल्ह्यासह नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीत कोल्हापूरच्या धर्तीवर भरीव अशी मदत करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट पिक विमा मंजूर करावा अशी मागणी आ.प्रतापराव पाटील चिखलीकर व माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे केली आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment