जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी गाळून, उकळून पिणे :- डॉ संगिता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड


लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड (बाजीराव पाटील) :- नांदेड जिल्हा मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पुराच्या पाण्यामुळे अनेक गावात कुटुंब बाधित झाले आहे त्यामुळे जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम यांच्या मार्गदर्शन खाली जिल्हा मधील गावान भेटी देऊन जलजन्य व किटकजन्य आजार उदभवणाऱ् नाही यासाठी प्रत्यक्ष भेटी देत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांनी आज दि.28/9/25 रोजी वाजेगाव येथील पूरग्रस्त बाधित यांना भेट देऊन सर्व पूरग्रस्तांची चौकशी केली त्यांचे समुपदेशन व त्यांच्या आरोग्याची तपासणी करून घेतली व औषध देण्यात आले.यावेळी एकुण ६५ रुग्ण तपासणी केली व गरोदर माता सेवा वंचित बालकांना लस देण्याची सुचना दिली. सर्व रुग्णांची एस.एन. एस .पी मध्ये नोंद घ्यावी असे सांगितले पूरग्रस्त बाधितांना स्वच्छ पाणीपुरवठा देणे करिता सरपंच जमील भाई यांना सुचित केले. मेडिकलोर ड्रॉप द्वारे पाणी शुद्ध करण्यास सांगितले पाणी स्तोत्रचे शुध्दीकरण करूनच पाणी पुरवठा करणे बाबत सूचना दिल्या. ताप रुग्ण सर्वेक्षण, मेलीथानची डस्टीग करणे करीता सुचना दिली . पूरग्रस्त बाधितांची दररोज आरोग्य तपासणी करण्याबाबत व दररोज औषधी पुरवठा करणे बाबत सूचना दिल्या. नागरीकांनी जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी गाळून, उकळून पाणी प्यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सगिता देशमुख यांनी केले आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ अमजदुलला, डॉ पाईकराव राजेश, आरोग्य पर्यवेक्षक कोशलये, कुंटुरवार रवी, आरोग्य सेविका शिंदे सिसटर, गटप्रमुख सिंधुताई पंचलिंगे, बि.सी.एम मुस्ताक भाई सर्व आशा ताई पूणेगाव उपकेंद्र व प्रा आ केंद्र वडगाव येथील सर्व कर्मचारी पस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments