लोकनेता न्युज नेटवर्क
लोहा (संतोष पाटील जाधव) :- लोहा तालुक्यातील मौजे पोखरभोसी येथील भुमिपुत्र तथा हल्ली मुक्काम हैदराबाद येथे वास्तव्यास असलेले विशाल केशव कांबळे यांना 2025 चा " बेस्ट MSME अवाॅर्ड ऑफ द ईयर ईन मार्केटिंग ॲड टेक्नॉलॉजी" चा पुरस्कार आघाडीच्या अभिनेत्रीं निकिता दत्ता यांच्या शुभहस्ते देऊन सत्कार व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथील पंचतारांकित हॉटेल "ताज पॅलेस" इथे "भारत निर्माण कॉन्क्लेव्ह अवॉर्ड्स 2025" दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आले होते.त्यात पोखर भोसी ता.लोहा येथील मुळ रहिवासी असलेले व सध्या हैद्राबाद येथे वास्तव्यास असलेले "श्री विशाल केशव कांबळे" यांना "बेस्ट MSME अवॉर्ड ऑफ द ईयर ईन मार्केटिंग अँड टेक्नॉलॉजी" चा पुरस्कार आघाडीची अभिनेत्री निकिता दत्ता यांच्या शुभ हस्ते देण्यात आला.या कार्यक्रमास प्रशिध्द अभिनेते मनोज बाजपेई व आदिल हूसेन हे ही उपस्थित होते.या पुरस्काराचे आयोजन " हिंदुस्तान टाइम्स" या आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्रांच्या वतीने आयोजित केला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे सन्माननीय केंद्रीय सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्री" श्री जितन राम मांझी" हे होते. तसेच सन्माननीय अतिथी म्हणून "श्री संजय सेठ" केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री व केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री सन्माननीय "श्री कमलेश पासवान" हे हि उपस्थित होते.या कार्यक्रमास भारतातील व विदेशातील विविध कंपन्यांचे CEO व Founder's उपस्थितीत होते.ह्या यशापर्यंत विशाल ला पोहचण्यासाठी खुप कठोर परिश्रम घ्यावे लागेले.विशालने त्याच्या कामाची सुरुवात इयत्ता दहावी या वर्गात शिकत असताना केली,तसेच स्वतःची टेक्नोबग आय टि सोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली व या कंपनीची को कंपनी असलेली "एॅनिक डिजिटल" चा प्रवास सुरू केला. या प्रवासादरम्यान त्याला असंख्य कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला तरी हार न मानता अहोरात्र मेहनत करत व असंख्य अडचणींवर मात करत जिद्दीने मार्गक्रमण करत पोखर भोसी सारख्या ग्रामीण भागातून इथपर्यंत पोहचला आहे.विशाल कांबळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल गावातील प्रतिष्ठित नागरिक व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment