लोकनेता न्युज नेटवर्क
श्री स्वामी समर्थ महाराज कृपाकींत सगर साहित्य गावगाडा निर्मित तात्यासो साहेबराव नंदन संपादीत,सगर दीपोत्सव दिवाळी अंकाचे संत सानिध्यात प्रसन्न अशा भक्तिमय वातावरणात गुणीजनांच्या उपस्थितीत, शांतीब्रम्ह प.पू. वारकरी रत्न महाराष्ट्रातील नामवंत जेष्ठ किर्तनकार श्री जयराम बाबा जाधव व सौ. मिराआई जाधव गोंडेगावकर यांच्या शुभ हस्ते गोंडेगाव ता. नांदगाव येथे मारोतीयाच्या मंदीरात भक्तिमय वातावरणात प्रकाशन संपन्न झाले. या प्रसंगी गावातील जेष्ठ श्रेष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाल्याने उपस्थित श्रोते सर्वच भाराऊन गेल्याचे दिसत होते. प्रथमतःहा अंकाचे संपादकीय मंडळाचा गावाच्या वतीने शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यकारी संपादक प्रा.डी.टी. पाटील सरांनी अंका विषयी मनोगत व्यक्त केले. नंतर टाळ्यांच्या गजरात प्रकाशन सोहळा संपन्न झाला. सगर साहित्याचे निर्माते अंकाचे मुख्य संपादक तात्यासो. साहेबराव नंदन यांनी आदरणीय जयराम बाबांचा व सौ. मिराआईचा कौटुंबिक हृद्य सत्कार केला. या प्रसंगी प्रकाशक तान्हाजी खोडे, सहसंपादक ललीतभाऊ साळवे, आर. जे. पाटील, से. नि. म. पो. भास्करराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संपादक साहेबराव नंदन यांनी सगर साहित्याची निर्मिती व अंकाची कुळकथा विषद केली. उपस्थितीत श्रोत्यांच्या आग्रहास्तव साहेबराव तात्यांनी अहिराणी कविता सादर करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली. प्रकाशन सोहळ्या प्रसंगी अंकाचे आधारवड स्वर्गीय ॲड. बापूसो. संभाजीराव पगारे यांची उनिव मात्र प्रकर्षाने जाणवत होती. एका डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाश्रृ ओघळत होते. संभाजी बापूंची आठवण क्षणोक्षणी येत असल्याने, थोडीशी कही खुषी ! कही गम ! अशी स्थिती संपादक मंडळाची झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरील भावात जानवत होते. संत सदणी संताच्या सानिध्यात संताच्या हस्ते अंकाचे प्रकाशन झाल्याने सर्वच भाराऊन गेल्याचे चित्र स्पष्ठ दिसत होते. विशेषतःहा अंकाचे मुखपृष्ठारील व्यक्तिरेखा सौ. गायत्री अनिलकुमार रामटेके. बल्लारशहा चंद्रपूर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. उत्कृष्ट रंगछटेचे मुखपृष्ठ आकर्षनाचा विषय ठरला होता. प. पू. बाबांच्या मधुर वाणीतून अंकाला शुभेच्छा व संपादक मंडळाला शुभआशिर्वाद देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी पिंपळनेर येथून मा. आर. जे. पाटील, प्रा. डी. टी. पाटील, कन्हैयालाल चौधरी, ताहाराबाद येथून ह. भ. प. एकनाथ [आण्णा ] साळवे, नाशिक येथून संपादक साहेबराव तात्या नंदन, ललितभाऊ साळवे, से. नि. पोलीस अधिकारी मा. भोगे साहेब, भास्करराव पाटील, प्रकाशक तान्हाजी खोडे , गुणवंत कामगार संजीव अहिरे उपस्थित होते शेवटी मंदीरात सर्वांनीच अल्पहार घेतला. नंतर संपादक मंडळाने बाबांच्या वैष्णव निवासस्थानी प्रसादतुल असा अमृतचहा दुग्ध पान घेत निरोप घेतला .
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment