नांदेड (बाजीराव पाटील) :- व्हि पी के उद्योग समूहाचे चेअरमन मा.श्री मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी या भागातील शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या हेतूने शेतकऱ्यांसाठी या उद्योग समूहाची निर्मिती केली आहे आणि शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या शिवाय त्याची प्रगती होणार नाही हे लक्षात घेऊन आपल्या भागातील शेतकऱ्याने शाश्वत उत्पादन देणारे पीक घेतल्या शिवाय हे सध्या होणार नाही याचा अभ्यास करून एक दोन नव्हे तर चार कारखाने आपल्या भागात उभे करून ऊसा सारखे शाश्वत व कणखर पीक घेण्याची वाट मोकळी करून दिली आहे आणि उसाचा शाश्वत व एकठोक पैसा शेतकऱ्याला वार्षिक स्वरूपात मिळतो आहे आणि आपल्या भागातील नवतरुण शेतकरी बांधव आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उच्चांकी उत्पादन घेत असल्याचे आपण पाहत आहात.शाश्वत ऊस शेती मध्ये पाहिले चार महिने लागवड व अंतर मशागतीची कामे असतात परंतु चार महिन्या नंतर फारसे काम ऊस शेतीत नसतं त्या मुळे शेती पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्याने दुग्ध व्यवसाय केला पाहिजे ज्यातून दर दहा दिवसाला पैशे मिळतात आणि त्याने आपले रोजचे प्रपंच सुरळीत चालून आपण सुखी व समाधानी होऊ शकतो.. शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या दुधाची खरेदी करून त्यावर प्रक्रिया करणारी साईकृपा दूध डेअरी गुरुजींनी निर्माण करून ठेवली आहे त्याचा उपभोग घेऊन आर्थिक विकास साधण्याची ही शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे.. कुटलाही व्यवसाय करायचा म्हंटल्यावर तरुणांपुढे सर्वात मोठं संकट आहे ते म्हणजे आर्थिक भांडवल उभा करणे आणि त्या संकटातून होतकरू तरुणांना मार्ग काढून देण्यासाठी कवळे गुरुजी हे खंबीर पणे उभे आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतून आधुनिक दुग्ध व्यवसाय योजना उदयास आली आहे.
या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यास दहा लाख रुपये कर्ज स्वरूपात मदत केली जाईल
सहभाग घेत असलेल्या सभासदाने सपत्नीक कोल्हापूर येथील दूध व्यवसाय मार्गदर्शक श्री अरविंद पाटील यांच्याकडील दोन दिवसांचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक असेल.(राहण्याची व जेवणाची सोय त्याच ठिकाणी असेल)प्रशिक्षणाचा सपत्नीक खर्च बारा हजार रुपये येणार आहे त्या पैकी निम्मा खर्च कवळे गुरुजी मार्फत केला जाईल आणि निम्मा खर्च शेतकऱ्यांनी करावा.प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या सभासदास प्रथम एक लाख रुपये कर्ज दिले जाईल त्यातून त्यांनी एक दुग्ध जनावर खरेदी करून सुरुवात करावी आणि उत्पादित झालेले दूध नियमितपणे साईकृपा डेअरीस घालावे व त्या नंतर दर महिन्याला एक जनावर खरेदी साठी एक लाख रुपये दिले जातील जेणेकरून दर महिन्यास एक नवीन जनावर आपल्याकडे येईल आणि त्याचे व्यवस्थापन करणे आपणास सोपे जाईल आणि व्यवस्थापन योग्य रीतीने होईल व नुकसानीची कुठलीही बाब घडणार नाही.. योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपली नावनोंदणी आपल्या कारखान्याचे जे शेती विभागाचे कर्मचारी आपल्या गावांसाठी काम करतात त्यांच्याकडे करावी. इच्छुक शेतकऱ्यांची नोंदणी आल्यानंतर कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाईल.जस्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन धवलक्रांती घडवून स्वतःची आर्थिक क्रांती घडवावी असे सावंत एस जे ऊस विकास अधिकारी व्हि पी के उद्योग समूह यांनी सांगितले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment