माध्यमिक आश्रम शाळा शिराढोण येथे सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न


लोकनेता न्युज नेटवर्क

शिराढोण (लक्ष्मण पांडागळे) :- माध्यमिक आश्रम शाळा शिराढोण तालुका कंधार येथील कर्मचारी श्री. विठ्ठल रामजी चव्हाण वस्तीग्रह अधीक्षक हे दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले असून त्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेची सचिव श्री. बळीराम लक्ष्मण राठोड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिराढोणनगरीचे सरपंच तथा भीमाशंकर विद्यालयाचे प्राचार्य श्री. खुशालराव माधवराव पांडागळे, पोलीस स्टेशन उस्माननगरचे स.पो.नी श्री. संजय निलपत्रेवार, साईनाथ पाटील कपाळे, देवराव पाटील पांडागळे, देवराव पाटील कपाळे, पत्रकार गजानन देवणे, पत्रकार लक्ष्मण कांबळे,पत्रकार माणिक भिसे, भीमाशंकर विद्यालयाचे कर्मचारी, कै. शंकर पाटील प्राथमिक आश्रम शाळा येथील कर्मचारी, लॉर्ड व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य लक्ष्मण पांडागळे, पोलीस पाटील कैलास कागदेवाड, किड्स क्लब इंग्लिश मीडियम स्कूलचे संतोष संगेवार व शिराढोण तांडा येथील प्रतिष्ठित नागरिक मित्रमंडळी हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्तावित शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस.बी. पवार यांनी केले तर सर्व मान्यवरांचे आभार श्री. नरवाडे यांनी मानले.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments