राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाचा शतक महोत्सव कुंडलवाडीत पंथ संचलन मोठ्या उत्सवात संपन्न



लोकनेता न्यूज नेटवर्क

कुंडलवाडी (गंगाधर दुसलवाड) :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यंदा १०० वर्षा पूर्ण होत असून देशभरात शतक महोत्सव साजरा करण्यात येत आहे . त्याचाच एक भाग म्हणून विजया दशमीच्या पूर्व संध्येला दिनांक २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कुंडलवाडीत संघाच्या स्वयंसेवक सेवक सेविकांनी शिस्तबद्ध गणवेशात पथ संचलन करून समाजा समोर संघ शिस्तीचे दर्शन घडवले. मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक के.रामलु मंगल कार्यालयात एकत्र जमले होते. केसरी पथक व घोषवाक्याच्या जयघोषात वातावरण धुमधुमले.स्वयंसेवकांनी संघांची पारं पारंपरिक गणवेशातील वेशभुषा करून तालबद्ध पद्धतीने संचालन शहरातील प्रमुख मार्गाची परिक्रम केली. नागरिकांनी ठिकठिकाणी फुल वृष्टी करून स्वागत केले. या संचलनासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे व पोलीस उपाधिकारी गजेंद्र मांजरमकर यांनी बंदोबस्ताची जबाबदारी समर्थपणे पार पाडली . संचालना दरम्यान वाहतुकीची कोणत्याही अडचण निर्माण होऊ नये यासाठी पोलीस सतर्क राहिले.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments