लोकनेता न्युज नेटवर्क
माहूर (सूरज खोडके) :- सध्या माहूर तालुक्यासह सर्वत्र पावसाचा जोर कायम सुरू असून सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील मेट गावास जोडणारा जीर्ण अवस्थेत असलेला नाल्यावरील पूल पाण्याच्या प्रवाहात अर्धवट वाहून गेल्यामुळे मेट वासीयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.यावर्षी अतिवृष्टीजन्य पावसाने कहर केला असून या मुसळधार पावसाचा सर्वत्र फटका बसला आहे.अशातच माहूर-किनवट क्र.161 या राष्ट्रीय महामार्गावरील माहूर पासून 12 कि.मी.अंतरावरून मेट गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील जीर्णावस्थेत असलेला पूल धोधो पडणाऱ्या पावसाने अर्धवट वाहून गेल्याने मेट येथील ग्रामस्थांना अर्धवट खचलेल्या पुलावरून ये जा करावी लागत असून दैनंदिन कामकाज वाहतूक आणि विद्यार्थ्यांच्या शाळा-कॉलेजच्या प्रवासावर देखील परिणाम झाला आहे.रात्रीच्या वेळी नवख्या नागरिकांनी सदर रस्त्यावरून वेगात वाहन नेल्यास एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसून पावसाचा जोर वाढल्यास आहे तो अर्धवट पूल पुराच्या पाण्याने वाहून जाण्याच्या मार्गावर आहे.त्याबरोबरच माहूर तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांची देखील मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment