सिंदखेड राजा :- संघटनेच्या बांधणीच्या अनुषंगाने तहसील कार्यालय सिंदखेड राजा येथे दि. 19 रोजी श्री. किशोर हटकर (राज्य सरचिटणीस तथा जिल्हाध्यक्ष बुलढाणा महसूल कर्मचारी संघटना) व श्री मिलिंद पाटील (सचिव महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्था) यांच्या प्रमुख उपस्थितीती मध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती.
सदर बैठकीमध्ये महसूल अधिकारी यांचे वतीने व सर्व पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर सिंदखेडराजा उपविभागीय अध्यक्षपदी श्री विकी जगताप तसेच तालुका अध्यक्ष पदी श्री संजय सोनुने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली..
यावेळी श्री कैलास राऊत (उपाध्यक्ष बुलढाणा जिल्हा), श्री प्रल्हाद शेळके (गेस्ट सभासद), निवासी नायब तहसीलदार प्रांजल पवार व पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते सदर बैठकीच्या दरम्यान महसूल अधिकारी यांचे वतीने विविध प्रश्नावर सकारात्मक चर्चा करून सर्वांनुमते बिनविरोध ही निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी सिंदखेड राजा उपविभातील सर्व महसूल पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते....!
________________________

Post a Comment