लोकनेता न्यूज नेटवर्क
कुंडलवाडी (गंगाधर दुसलवाड) :- कुंडलवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने आजा नारीशक्ती उत्सवात व आनंदात पार पडली . महिला विषयीच्या कायद्याबाबत जागृती निर्माण करणे हा रॅलीचा प्रमुख उद्देश होता . या रॅलीचे मध्ये उद्घाटन कांती ढोंबे , उपविभागीय अधिकारी, बिलोली यांच्या करण्यात आला .के. रामलु इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून समाजातील महिलांच्या प्रश्नावर प्रकाश टाकला . तसेच पूजा ठोमसे आणि आरती मोकळे यांनी महिला सबलीकरण विषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या पथ नाट्यामुळे रॅली मध्ये आकर्षण प्राप्त झाले .या रॅलीत महिला व विद्यार्थी जास्तीत जास्त मोठ्यासंख्येने उपस्थित होते . हरिभक्त परायण कान्होपात्रा ताई यांनी महिला व नारीशक्तीचे महत्व स्पष्ट केले , तर वैद्य अधिकारी डॉ सारिका अनमुलवाड यांनी आरोग्य विषयी माहिती दिली . सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी सांगितले की , नारीशक्तीचा पुढाकार वाढविण्यासाठी आणि काय देविषयक माहिती सर्व पर्यंत पोहोचावी , यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार यांनी या रॅली मुळे समाजात चांगला प्रकारचा वातावरण निर्माण होईल असे प्रतिपादन केले .मा. माझी चेअरमन प्रतिष्ठ व्यक्ती साईनाथ उत्तरवार यांनी देखील आपले विचार व्यक्त केले . तसेच डॉ. प्रशांत सब्बनवार यांनी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नरेश बोधनकर यांनी केले , तर आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरेकर यांनी केले . कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली . पोलीस स्टेशनच्या वतीने काढलेल्या या रॅलीचे सर्वत्र कौतुक होत आहे . रॅलीच्या यशस्वी ते साठी महिला दक्षता समिती यांनी विशेष परिश्रम घेतले.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment