लोकनेता न्युज नेटवर्क
कंधार (प्रदिप पाटील मुगावे) :- नांदेड जिल्ह्यात गेली तीन चार दिवसापासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. तसे जिल्ह्यातील नदी, ओढे ओसंडून वाहत आहेत, त्यामुळे कुठेही जीवित हानी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन काळजी घेत आहे. दि, २७सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कंधार पोलीस स्टेशन चे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव साहेब यांच्या मार्गदर्शना खाली अतिदक्षता म्हणून नागरिकांना मदत करण्यासाठी पोलीस कर्मचारी पाठवले होते. कुरूळा भागात जोरदार पाऊस होऊन बोळका व हटक्याळ गावा कडे जाणाऱ्या पुलावरून रस्त्यावर पूर येत आहे .व दोन्ही गावाकडील सपंर्क तुटला आहे असी माहिती कर्तव्यावर असलेल्या कुरूळा बिट जमादार प्रकाश टाकरस यांना मिळाली, त्यावेळी त्यांनी तात्काळ पाऊस चालू असताना सुद्धा घटना स्थळी जाऊन नागरिकांना पुलावरून वाहने घेऊन जाऊ नये व काळजी घेण्याचे आव्हान केले. दिवस भर पाऊस चालू असताना सुद्धा भर पावसात पोलीस बांधव त्याच ठिकाणी थांबून जीवित हानी होऊ नये म्हणून नागरिकांना आव्हान करीत होते. जमादार टाकरस यांच्या सोबत पोलीस कॉन्स्टेबल माधव धुळगंडे व होमगार्ड बी, डी गुघे हे सुद्धा उपस्थित होते.भरपावसात सुद्धा आपले कर्तव्य पारपाडल्यामुळे जनतेतून पोलिसांनचे कौतुक होत आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment