लोकनेता न्युज नेटवर्क
हवेली (तालुका प्रतिनिधि) :- बारामती मधील उत्कर्षनगर येथे नैसर्गिक ओढा वाहत असल्याने उत्कर्षनगर रोड वरून त्याचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असून गेल्या 10 दिवसांपासून याठिकाणी पाणी वाहत असून, याठिकाणी शाळेत जाणाऱ्या व कामावरती जाणाऱ्या लोकांना ओढ्याच्या पाण्यामधून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून उत्कर्षनगर रोड मोठ्या प्रमाणात खचलेला आहे तो दुरुस्त करण्यात यावा.
भिगवन रोड येथील अभिषेक हॉटेल चौक सर्व्हिस रोड पासून उत्कर्ष नगर कडे जाणाऱ्या रोड येथील रस्ता शासनाच्या नियमाप्रमाणे 40 फूट रुंदीचा असून या रस्त्याच्या बाजूला पी टी गांधी यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनधिकृत अतिक्रमण करून रस्त्यावरती सिमेंटचे डांब रोवलेले आहेत, रस्ता दहा ते बारा फूट ठेवला आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे ते अजुन पर्यंत काढलेले नाही,
बारामती शहर व परिसरामध्ये गेल्या आठ-दहा दिवसांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असून पावसामुळे ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या ठिकाणी पाणी साचून साचलेल्या पाण्यावरती डेंगूसदृश डास झालेल्या आहेत याचाच प्रत्यय उत्कर्ष नगर येथील अजित देशमुख व त्यांचा भाचा यांना डेंगूची लागण झालेली आहे. तरीदेखील नगरपालिकेने कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही.
वरील प्रकारे सर्व मागण्या साठी उत्कर्ष नगर येथील ओढ्यामधील पाण्यामध्ये अर्धे बुडून आमरण उपोषण वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाअध्यक्ष राज कुमार व बाळासाहेब चव्हाण यांनी आंदोलन केले यावेळी बारामती व उत्कर्षनगर येथील नागरीक, महिला, शाळेतील मुले मोठ्या प्रमाणात सहभागी होते.
प्रमुख मागण्या
1) उत्कर्षनगर येथील ओढ्यातील पाणी विसर्ग करणे.
2) बारामती मध्ये डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळून आहेत त्याचे निवारण करणे.
3) पी. टी. गांधी यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूस केलेले अतिक्रमण काढणे बाबत…. (अभिषेक हॉटेल चौक सर्व्हिस रोड ते उत्कर्ष नगर रस्ता.)
4) उत्कर्षनगर कडे जाताना ओढ्यावरती कायमस्वरूपी पूल बांधणे बाबत..
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment