दारुसह ४लाख २८हजाराचा मुद्दे माल जप्त ;एकास अटक दसरा उत्सवाचा तोंडावर गोंडपिपरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई


लोकनेता न्यूज नेटवर्क

गोंडपिपरी (आशिष निमगडे) :- गडचिरोली जिल्ह्यात पूर्णतः दारू बंद असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू ची अधून मधून तस्करीत केल्याचे निदर्शनास येत आहे. पोलीस विभाग देखील दारू तस्कराच्या मुसक्या आवरण्यास सज्ज असल्याचे कारवाई अंती दिसून येत आहे.(दि. २९)रोजी १९-३० वाजताचे सुमारास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले साहेबांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळताच गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे व पोलीस स्टाफ सह शिवाजी चौक गोंडपिपंरी येथे नाकाबंदी केली असता महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच ३३टी ३३७६ ही गाडी बल्लारशा वरून येत असताना दिसून आले. सदर वाहनास थांबून वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारू संत्रा ९० मिलीच्या ४०० नग बाटल्या किंमत १६०००/-रु. व रॉयल स्ट्राँग १८० मिलिच्या ४८ नग विदेशी दारूच्या बाटल्या किंमत १२०००/-रु. असा एकूण २८ हजार रुपयांच्या दारूचा मुद्देमाल व पिकअप वाहन किंमत ४००,०००/-रु. असा एकूण ४२८०००/-रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी नरेश गुरुपद भक्त वय ३० वर्ष रा. सुभाषग्राम पोस्ट गुंडापल्ली तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली यांच्या विरोधात कलम ६५(अ ), ८३म. दा. का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments