बारूळ (प्रतिनिधी) :- कंधार तालुक्यातील दिग्रस (बु.(येथील भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते तथा माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक लालबा संभाजी पाटील शिंदे यांची उपाध्यक्षपदी तर कवठा येथील शिवसांब भोजराज देशमुख यांची चिटणीस पदी निवड भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी जाहीर केली आहे.
देशमुख हे विद्यार्थी दशे पासूनच रामजन्मभूमी आंदोलन, राम पादुका पूजन अशा कार्यक्रम प्रसंगी सक्रिय सहभाग घेत सन १९९५ - ९६ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहर मंत्री म्हणून व १९९८ मध्ये भाजपा युवा मोर्चा कंधार तालुका अध्यक्ष म्हणून प्रभावीपणे काम केले. २००२ते २००६या कालावधीत भाजपा कंधार तालुका उपाध्यक्ष म्हणून काम केले असून, २०१७ मध्ये कवठा गटातून जिल्हा परिषद जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आहे.
शेतकरी उत्पादक कंपनी, सामाजिक प्रश्नासाठी आंदोलने करून, सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला. या त्यांच्या सामाजिक व पक्ष मजबूत करण्याच्या कामाची दखल घेऊन, देशमुख यांची भाजपाच्या नांदेड दक्षिण ग्रामीणच्या चिटणीसपदी निवड करण्यात आली. सदरच्या निवडीबद्दल लालबा पाटील शिंदे व शिवसंब देशमुख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment