माहूर (सूरज खोडके) :- श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात येत्या 22 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या नवरात्र महोत्सवानिमित्त गडावर लाखो भाविक येणार असून दरवर्षी भाविकांना 225 पायऱ्यावर तासंतास रांगेत दर्शनासाठी उभे राहून घामाघुम व्हावे लागत होते आणि त्याच पायऱ्यावरून खाली उतरावे लागत होते त्यामुळे पायऱ्यावर प्रचंड गर्दी होत होती आता मात्र मंदिर प्रशासनाकडून श्री परशुराम मंदिरा कडून भाविकांना गडावरून खाली उतरण्यासाठी पायऱ्या बनविण्यात आल्याने श्री परशुराम मंदिरावर सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेऊन निसर्गाचा आनंद घेत भाविकांचे दर्शन निर्विघ्न आणि सुलभ रित्या पार पडणार असल्याने अंतिम टप्प्यात असलेल्या पायऱ्यांच्या कामाची उपविभागीय अभियंता डि के भिसे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कंत्राटदारांना दोन दिवसात काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या श्री रेणुका देवी विश्वस्त समितीचे पदसिद्ध अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सचिव सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंतुला उपाध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे तहसीलदार तथा कोषाध्यक्ष अभिजीत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र महोत्सव पार पडणार असून झालेल्या यात्रा नियोजन बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंतुला अप्पर पोलीस अधीक्षक तथा पोलीस यात्रा प्रमुख श्रीमती अर्चना पाटील यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे कार्यकारी अभियंता विशाल चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता डि के भिसे सहाय्यक अभियंता रवींद्र उमाळे क अभियंता पवन हंचाटे कंत्राटदार संजय भाऊ मारवाडे यांचे सह कर्मचाऱ्यांना घेऊन अभियंता डि के भिसे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून भाविक दर्शन केल्यानंतर उतरण्याच्या मार्गावर होत असलेल्या पायऱ्यांच्या कामात कमतरता राहू नये तसेच वृद्ध भाविकांना उतरताना कुठलाच त्रास होणार नाही याबाबत खातर जमा करून कंत्राटदारांना दोन दिवसात काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या श्री रेणुका देवी विश्वस्त समितीकडून पायऱ्यांच्या कामासाठी एक कोटीचा निधी खर्च करण्यात येत असून याद्वारे 135 मीटर लांब पायऱ्या बनविण्यात येत आहेत उपविभागीय अभियंता डी के भिसे हे या पायऱ्या जास्त उंच होऊ नये जास्त उतारही राहू नये याची काळजी घेत प्रत्यक्ष उभे राहून बनवून घेत असल्याने या ठिकाणी नवरात्रोत्सवात येणारे भाविक या पायऱ्या द्वारे रस्त्यावर येताच भाविकांना एसटी बसमध्ये प्रवेश मिळणार असून आरामदायक प्रवास करून त्यांना पार्किंग किंवा बस स्थानकावर नेऊन सोडण्यात येणार असल्याने भाविकांना दरवर्षी होणारा गर्दीचा त्रास यावर्षी जाणवणार नसून भाविकांचे दर्शनही सुलभ होऊन निसर्गाचा आनंद घेत सहजरित्या उतरता येणार असल्याने शेकडे वर्षापासून भाविकांना होत असलेली सर्वात मोठी अडचण दूर झाल्याने भाविकातून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यासह मंदिर प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यतत्परते प्रति अभिनंदन व्यक्त होत आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment