लोकनेता न्युज नेटवर्क
जालना (महेश मुंढे):- येथील श्रीमती दानकुँवर हिंदी कन्या विद्यालय एंव कनिष्ठ महाविद्यालय जालना व एकात्म मानव दर्शन व पंडित दिनदयाल उपाध्याय हिरक महोत्सव समिती तर्फे आयोजित आंतरशाळेत निबंध/ पोस्टर/ वक्तृत्व / प्रश्नमंजुषा स्पर्धेचे पुरस्कार वितरण आज संपन्न झाले .प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष महेंद्रकुमारजी गुप्ता, संस्थेचे कोषाध्यक्ष व अशासकीय सदस्य पंडित दीनदयाल उपाध्याय हिरक महोत्सव समिती, कार्यकारिणी सदस्य विनोदजी अग्रवाल, मुख्याध्यापिका सौ .गायत्री शुक्ला, पर्यवेक्षक राजेश देशपांडे , विविध स्पर्धेचे परीक्षक श्रीकांत चिंचखेडकर, डॉ . माधव ढेरे, सतीश संचेती, सीमा नादरे यांची व्यापीठावर उपस्थिती होती .प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ .अर्चना लोखंडे यांनी केले ,याप्रसंगी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनातील विविध पैलु उडगलणारी एक सुंदर नाटिका विद्यार्थीनी सादर केली .पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनातील घटना व कार्य यावर प्रश्नमंजुषा ही घेण्यात आली .विविध शाळेतून विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनावरील व त्यांच्या विचारावर रेखाटलेले सुंदर असे चित्रांचा प्रदर्शन ही भरविण्यात आला .या प्रर्दशनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी विविध शाळेतून आलेल्या स्पर्धकांनी निबंध , पोस्टर वक्तृत्व ,प्रश्नमंजुषा स्पर्धेत आपला उत्स्फुर्त असा सहभाग नोंदविला .या विविध स्पर्धेत प्रामुख्याने राष्ट्रीय हिंदी विद्यालय (अंग्रेजी )माध्यम , महाराष्ट्र हायस्कूल , नवयुवक विद्यालय ,स्व . नंदकिशोर सहानी विद्यालय ,श्रीमती दानकुंवर हिंदी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,श्री म .स्था जैन विद्यालय , शांती निकेतन विद्यालय , स्व लालचंदजी सकलेचा (अंग्रेजी ) माध्यम, विद्यालय ,मराठा विद्यालय ,सि .टी . एम .के . विद्यालय या शाळानी सहभाग नोंदविला .निबंध स्पर्धेत सोहा नजीब शेख -प्रथम, यशिका प्रमोद बागडी - द्वितीय , गार्गी गिरीश जोशी - तृतीय तसेच वक्तृत्व स्पर्धेत सायली सतीश गोरे - प्रथम , श्रावणी शिवाजी बानेलवाड -द्वितीय, वरद नारायण भुजंग - तृतीय पोस्टर स्पर्धेत रसिका नंदू रामटेके -प्रथम, हर्ष संदीप बावणे -द्वितीय, कुमकुम सुरेश जांगीड - तृतीय ,निर्मला सुरेश जग धणे -उत्तेजनार्थ ,श्रावणी रवींद्र हिवरे- उतेजनार्थ स्वाती बाळासाहेब बारटक्के उतेजनार्थ असे यश संपादन केले . या सर्व विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोख रक्कम , प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले .याप्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष व अशासकीय सदस्य पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सव समितीचे श्री संजयजी अग्रवाल यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनातील अनेक घटनांचा उल्लेख करून राष्ट्राच्या हितासाठी त्यांनी दिलेला योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .गायत्री शुक्ला, परिक्षक श्रीकांत चिंचखेडकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले .संस्थेचे अध्यक्ष श्री महेंद्रकुमारजी अग्रवाल यांनी ही मोलाचे मार्गदर्शन केले .याप्रसंगी संपन्न झालेल्या विविध स्पर्धेच्या परिक्षण करणाऱ्या परीक्षकांचा ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला .सौ .चारुशीला दाभाडकर, प्रियंका चित्राल ,सौ .मनीषा दायमा ,सौ .किरण शर्मा ,सौ . शिल्पा पारिक , चंद्रकांत दायमा,सौ .दिपाली मित्तल , यांनी परीक्षणास सहकार्य केले . या सर्वांचाही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .याप्रसंगी प्राध्यापक /शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी विविध शाळेतून आलेले विद्यार्थी /विद्यार्थीनी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांची उपस्थिती होती .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालय व शाळेच्या शिक्षक / शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन सुरेंद्र धोका व आभार प्रदर्शन सौ . प्रियंका चित्राल यांनी केले .
--------------------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment