लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड | बाजीराव पाटील कळकेकर :- राष्ट्रीय पोषण माह निमित्त पोषण आहार व आरोग्य विषयक प्रशिक्षणा साठी नांदेड जिल्ह्यातील 30 अंगणवाडी शिक्षिका, सेविका, कृषि सखी, व इतर महिला अश्या एकूण ६०-७० महिलांचा समावेश होता. सौ. अल्का पवळे (गृह विज्ञान तज्ञ) के. वि. के. पोखर्णी यांनी पोषण आहाराबद्दल जनजागृती करण्याच्या हेतुने सदरील प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. माधुरी रेवणवार (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) के.वि.के. सगरोळी नांदेड-२ व सौ.ज्योती तुप्तेवार (अंगणवाडी पर्यवेक्षिका) यांची विशेष उपस्थिती लाभली. डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) कृ.वि.कें.पोखर्णी यांनी कार्यक्रमा चे सूत्रसंचालन केले,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. देवीकांत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) के. वि. के पोखर्णी, यांनी सादर केले. त्यामध्ये त्यांनी माहिलांनी आहार व आरोग्यची काळजी घेण्याचे आवाहन करुन पोषण आहार बद्दल जनजागृती करणे का गरजेचे आहे यावर प्रकाश टाकला.
यानंतर डॉ. माधुरी रेवणवार मॅडमने उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले महिलांनी जे वैविध्य पूर्ण पदार्थ सदरील मूल्यवर्धित पाककला स्पर्धे मध्ये बनवले होते,त्याचा सोप्या आणि सहज पाक कृती करून इतर महिलांना त्याचे प्रात्यशिक दाखवावे तसेच चांगल्या आहारा बरोबर, शारीरिक व मानसिक आरोग्यावर भर द्यावा आणि संतुलित आणि सकस आहारचे सेवन करावे तसेच सेंद्रिय पोषण बागेची गरज व अन्नातील रंगघटकाचे महत्व तसेच स्त्रिया मधील विविध कर्करोग ह्या बद्दल जानजागृती केली.
यानंतर मूल्यवर्धित पाककला स्पर्धे मध्ये महिलांनी विविध पदार्थ तयार करून आणले होते ज्यामध्ये भरडध्यान वापरून इडली, अप्पे, थालीपीठ, चकली, डोसा, वडी, गव्हाच्या कण्याच्या मुटके अश्या पारंपरिक पाककृतीचा समावेश होता, ज्यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय असे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले.
यानंतर आध्यक्षीय समारोप डॉ. एस. डी. मोरे (संचालक), कृषि विज्ञान केंद्र, यांनी केला यामध्ये पोषक आहार कसा घेतला पाहिजे व हा आहार घेताना प्रत्येक घटकाचे महत्व ओळखून ते किती प्रमाणात घेतले पाहिजे व महिलांनी स्वयरोजगार बद्दल के. वि. के पोखर्णी मध्ये येऊन प्रशिक्षण घ्यावे याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. माणिक कल्याणकर (पिक संरक्षण तज्ञ) यांनी केले. तसेच कृ.वि.के.चे डॉ.एम. एन.अंबोरे (पशुवैद्यक तज्ञ ), प्रा.एस.एच. जायभाये (कृषि विद्या तज्ञ ), श्री ए.जी भालेराव,श्री आर.आर. इंगोले,श्री आर.टी. वाडीले,श्री डी. आर.कदम, सौ.पी. एस. हाडोळतिकर, श्री एस.एस. गायकवाड,श्री आर.जी.राऊत आणि श्री.संतोष वाघमारे यांचे देखील हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष सहकार्य लाभले.
Post a Comment