लोकनेता न्यूज नेटवर्क
नांदेड (गोविंद पाटील मोरे) :- दि-30 सप्टेबर रोजी शिवणी जा सायाळ येथे दुपारी 4:25 वाजता शिवारात व गावात अतिशय स्फोटक अशा आवाज झाला शेतातील कामे करणारे लोक या आवाजाने भयभीत झाले . हा आवाज कोणत्या कारणामुळे झाला काही गावकरी हा भुंकप आहे असे सांगत होते तर भुकंप म्हणजे जमिनी ला हदरा बसतो पण हा तर भयंकर स्फोट सदृश्य आवाज झाला काही गावकरी म्हणतात आकाशात विमान उडताना दिसले हा स्फोट विमानमुळे झाला असावा किंवा विमानातून बॉम्ब तर टाकला नसावा अशी शंका गावातील लोक व्यक्त करत आहेत या बाबींचा तपास संबंधीत महशुल विभागाने करावा अशी मागणी गावातील जनता करतांना दिसत आहेत . सदरिल आवाज सायाळ या गावातील लोकांना पण येकू आला असे सायाळ येथील गावकऱ्यांनी सदरिल प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले .
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment