लोकनेता न्यूज नेटवर्क
देऊळगाव राजा :- शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचालित दीनदयाल विद्यालय व कनिष्ठ कला आणि विज्ञान महाविद्यालय दे.राजा जि बुलढाणा येथे कार्यरत असलेले वरीष्ठ लिपिक श्री.सतीशजी कुळकर्णी हे रविवार दि.३१ ऑगस्ट २०२५ रोजी नियतवयोमानानूसार सेवा निवृत्त होत आहेत त्या निमित्ताने त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच शिप्रमं चे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे,सचिव मा.प्रेमराजसेठ भाला यांच्यासह सर्व संचालक मंडळीनी श्री.सतीशजी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिप्रमंचे प्रशासकीय संचालक मा.अरविंदभैय्या शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यालयात हा सेवापूर्ती गौरव सोहळा पार पडला. प्रसंगी शिप्रमंचे संचालक मा.अशोकभाऊ कोटेचा,मा.गोपालजी बोरा,स्थानिक सल्लागार अँड. घनश्यामजी भाला,श्री.धर्मराज हनुमंते,श्री.छबुराव भावसार,त्र्यंबकराव जायभाये काका, भगवानराव कायंदे, माजी प्राचार्य श्री. एस.बी.गारडे, माजी पर्यवेक्षक श्री.आर.के.डोईफोडे,श्री.एस.एन.व्यास, लोकमतचे पत्रकार श्री.मुकुंदजी पाठक,पत्रकार श्री.सन्मती जैन,भाजपच्या सविता पाटील,शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र घुबे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होत्या.
सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती श्री.सतीशजी कुलकर्णी यांनी मी,"निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करत राहिलो म्हणुनच संस्थेत ३३ वर्षे इतकी प्रदीर्घ सेवा करू शकलो" असे प्रतिपादन केले.तसेच संस्थेच्या तत्कालीन संचालकांचे आणि संस्थेचे ऋण व्यक्त करतांना सतिशजी यांचे वडील श्री.सुधाकरराव कुळकर्णी यांना गहिवरून आले डबडबलेल्या डोळ्यांनी सर्वांचे आभार मानून त्यांनी श्री. सतिशजी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,आशीर्वाद दिला.
या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संदिप डोईफोडे सर यांनी केले तर प्राचार्य श्री.रामेश्वरजी कुटे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले,शेवटी पर्यवेक्षक श्री.राजेशजी भिवटे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
________________________

Post a Comment