देऊळगाव राजा :- शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचालित स्थानिक दीनदयाल विद्यालय व कनिष्ठ कला आणि विज्ञान महाविद्यालयाची श्री.गणेश विसर्जन मिरवणूक आज शनिवार ०६दि. सप्टेंबर२०२५रोजी उत्साहात पार पडली.
विसर्जन मिरवणूकीत विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील वर्गशिक्षकांनी आपापल्या वर्गाचे स्वतंत्र देखावे तयार करून सादर केले. ११वी १२वी विज्ञान विभाग टाळनृत्य- ढोलपथक,कला विभाग साडी ड्रिल, कवाड यात्रा०९ब,सिंहस्थ कुंभमेळा नागासाधु ८ड,एक कदम स्वच्छता की और ७क,ऑपरेशनसिंदूर५ब,शिवराज्याभिषेक सोहळा १०क,पाणी व्यवस्थापन काळाची गरज ९अ,एक पेड माँ के नाम ५अ,साक्षरता अभियान ७ ब, मोबाइलचे दुष्परिणाम८अ,खेलोइंडिया६अबक,अष्टविनायक दर्शन १०ड,जगाचा पोशिंदा शेतकरी ८क, मतदान जागृती अभियान १०ब,धर्मो रक्षती रक्षित:,१०अ,पंढरीची वारी ७अ,हरघर तिरंगा ९क,विठ्ठलाची नगरी ८ब,जन कल्याणकारी योजना ९ड याप्रमाणे एकूण २० देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी संपूर्ण शहर गणपती बाप्पा मोरयाच्या गर्जनेने दुमदुमले.
गणेशोत्सव प्रोत्साहन समितीचे अध्यक्ष मा.ब्रिजमोहन मल्लावत यांच्या अध्यक्षतेखालील निरीक्षण समितीने या सर्व देखाव्याचे विद्यालयात येऊन निरीक्षण केले.दरम्यान आमदार मनोजभाऊ कायंदे यांच्या मातोश्री श्रीमती नंदाताई कायंदे,सदाशिव मुंढे विभागीय पोलीस अधीक्षक मनीषाताई कदम,प्रोत्साहन समितीचे सदस्य सचिन धन्नावत,योगेश खांडेभराड,मंगेश तिडके पत्रकार श्री.सूरज गुप्ता,अँड.घनश्यामजी भाला,स्थानिक सल्लागार,श्री.त्र्यंबकराव जायभाये,भगवानराव कायंदे, माजी पर्यवेक्षक श्री.आर.के.डोईफोडे, श्री. एस. एन. व्यास सर आदी उपस्थित होते.
या विसर्जन मिरवणूकीत प्राचार्य रामेश्वरजी कुटे पर्यवेक्षक श्री.राजेशजी भिवटे सर तसेच विद्यालयातील श्री.गणेशोत्सव समितीचे प्रमुख श्री.आर.सी.पडूळकर सर,श्री. एस.आर.जायभाये यांच्यासह सर्व शिक्षक - शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वितरण करून मिरवणुकीची सांगता झाली .
________________________

Post a Comment